cocaine Dainik Gomantak
देश

Delhi Drug Case: दिल्लीत 500 किलोहून अधिक कोकेन जप्त, मुख्य आरोपीचे काँग्रेस कनेक्शन आले समोर!

Delhi Drug News: दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिसांनी मंगळवारी (8 ऑक्टोबर) 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 500 किलो कोकेन जप्त केले.

Manish Jadhav

Delhi's Biggest Drug Bust: दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिसांनी मंगळवारी (8 ऑक्टोबर) 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 500 किलो कोकेन जप्त केले, जे दिल्ली आणि उत्तर भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज खेप असल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेले कोकेन दक्षिण अमेरिकेतून आणण्यात आले होते, विशेषत: सणासुदीच्या हंगामात आणि अनेक हाय-प्रोफाइल मैफिली दरम्यान संपूर्ण भारतभर ड्रग्जचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने मोठ्या कार्टेल ऑपरेशनचा एक भाग. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने दक्षिण दिल्लीतील महिपालपूर येथून चौघांना अटक केली. दिल्लीचे रहिवासी तुषार गोयल (40), हिमांशू कुमार (27) आणि औरंगजेब सिद्दीकी (23) आणि मुंबईचे रहिवासी भारत कुमार जैन (48) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ड्रग्ज किंमत किती?

ड्रग्ज जप्तीसंबंधीचे रिपोर्ट वेगवेगळे समोर आले आहेत. पोलिसांनी सुमारे 500 किलोग्रॅम कोकेन जप्त केले. मात्र काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा आकडा 540-560 किलोग्रॅम इतका असू शकतो. प्राथमिक रिपोर्टनुसार, या ड्रग्जची किंमत 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तथापि, एजन्सीच्या अंदाजानुसार नंतर हा आकडा 5,620 कोटींहून अधिक झाला. कोकेनचे नेमके प्रमाण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अद्याप स्पष्ट नाही.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे काँग्रेसचे कनेक्शन

तुषार गोयल हा दिल्ली काँग्रेसमध्ये आरटीआय सेलचा प्रमुख आहे. ड्रग्जचे काँग्रेस कनेक्शन समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून स्पष्टीकरणाची मागणी करण्याबरोबरच ड्रग्जच्या व्यापारातून मिळालेला पैसा निवडणुकीच्या काळात वापरला जात आहे का, असा प्रश्नही लोक आता विचारु लागले आहेत. या मुद्द्यावरुन भाजप काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे.

आरोपीची भूमिका

तुषार गोयल हा ड्रग सिंडिकेटचा मुख्य आरोपी आणि किंगपिन आहे. गोयल याच्याशिवाय त्याच्या तीन साथीदारांनी या कारवाईत वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. गोयलचा अंगरक्षक हिमांशू कुमार याने कार्टेलचा अंमलबाज म्हणून काम केले. तर गोयलचा ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या औरंगजेब सिद्दीकीने ड्रग्जची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करुन लॉजिस्टिकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित भरत कुमार जैन याने मुंबईतील कार्टेलच्या कारवाया चालवण्यास मदत केली. एवढचं नाहीतर त्याने गोयलसोबत ड्रग्ज वितरणासाठीही काम केले.

40 किलो गांजाही जप्त करण्यात आला

पोलिसांनी गोदामावर छापा टाकला असता अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गांजा सापडला. प्रति किलो 12 कोटी रुपये किमतीच्या कोकेनसह, अधिकाऱ्यांनी 40 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला, ज्याचे अंदाजे बाजार मूल्य 60 लाख रुपये प्रति किलो आहे. गोयल याच्या कौटुंबिक व्यवसायाचा भाग असलेल्या पुस्तकांच्या पेट्यांमध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आली होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT