Delhi Crime ai generated images
देश

Delhi Crime: दिल्लीत माणुसकीला काळिमा; 70 वर्षांच्या अंध आणि मतिमंद वृद्धेवर विटेनं हल्ला करत बलात्काराचा प्रयत्न; 'नराधमाला तात्काळ फाशी द्या'

Delhi Trilokpuri Crime: दिल्लीतून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

Delhi Trilokpuri Crime: दिल्लीतून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. पूर्व दिल्लीतील मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या त्रिलोकपुरी भागात एका नराधमाने अंध आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या एका 70 वर्षीय वृद्धेला विटेने मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 70 वर्षीय महिला अंध असून ती मतिमंद आहे. गेल्या 35 वर्षांपासून ती याच भागात रस्त्यावर राहून आपले जीवन कंठत होती. परिसरातील दयाळू लोक तिला खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे देत असत, ज्यावर तिचा उदरनिर्वाह चालत होता. संपूर्ण परिसरात ती सर्वांच्या परिचयाची होती. मात्र, गुरुवारी मध्यरात्री एका नराधमाने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.

ही वृद्ध महिला एका दुकानाच्या बाहेर झोपलेली असताना आरोपी तरुण तिथे आला आणि तिला त्रास देऊ लागला. जेव्हा त्या वृद्धेने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा नराधमाचा राग अनावर झाला. त्याने जवळच पडलेली वीट उचलली आणि तिला मारायला सुरुवात केली. त्याने विटेने मारहाण करुन तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या नृशंस कृत्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला.

हा सर्व धक्कादायक प्रकार तिथे असलेल्या एका दुकानाच्या बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या दुकानाच्या बाहेर तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, ज्यामध्ये आरोपीचे हे भयानक कृत्य स्पष्टपणे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज अत्यंत संवेदनशील असून ते पाहण्यापलीकडचे आहे. यामध्ये तो तरुण अत्यंत निर्दयीपणे वृद्धेच्या चेहऱ्यावर विटेने वार करताना दिसतो. सातत्याने केलेल्या या हल्ल्यामुळे महिला अचेत झाल्यानंतरही तो थांबला नाही. तो तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाही तिच्या चेहऱ्यावर विटेने प्रहार करत होता.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्रिलोकपुरी परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक रहिवाशांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले; कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून पोलीस चौकी अवघ्या 50 मीटर अंतरावर आहे. एवढ्या जवळ पोलीस चौकी असतानाही इतका मोठा गुन्हा घडल्याने नागरिक संतप्त झाले.

सध्या गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे (Police) या नराधमाला लवकरात लवकर अटक करुन फाशीसारखी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT