Delhi Blast Dainik Gomantak
देश

Delhi Blast: मुंबईसारख्या हल्ल्याचा कट दिल्लीत? इंडिया गेट, रेल्वे स्थानकं दहशतवाद्यांच्या रडारवर! लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर खुलासा

Delhi Red Fort car blast: दिल्लीमध्ये लाल किल्ल्यानजीक कार स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांच्या टोळीने अन्य ठिकाणेही लक्ष्य करण्याचा कट आखला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाल किल्ल्यानजीक कार स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांच्या टोळीने अन्य ठिकाणेही लक्ष्य करण्याचा कट आखला होता. मुंबईतील २६-११ च्या धर्तीवर दहशतवाद्यांना हे हल्ले घडवून आणायचे होते.

दोनशे बाँबच्या साह्याने राजधानी दिल्लीतील इंडिया गेट, कॉन्स्टिट्युशन क्लब, गौरीशंकर मंदिर, रेल्वे स्थानके, दिल्लीतील मॉल; तसेच गुरुग्राम आणि फरिदाबाद येथेही त्यांना घातपात घडवून आणायचा होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. देशव्यापी कट यासाठी आखण्यात आला होता.

दिल्लीत हल्ले घडवून आणण्याचे कारस्थान पाकिस्तानमधील ‘जैशे महंमद’ ही दहशतवादी संघटना जानेवारीपासून रचत होती आणि त्यासाठी दोनशे बाँब तयार करण्यात येत होते.

मुझम्मीलकडून पाहणी

दहशतवादी कारवायांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मील गनी याने जानेवारी महिन्यामध्येच अनेकदा लाल किल्ल्याची पाहणी केल्याचे उघड झाले आहे. त्याने तुर्कीएलाही भेट दिली होती, याच भेटीत त्याची काही हस्तकांसोबत चर्चा झाली असावी. त्याच्याच ताब्यातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यावर तुर्कीएचा शिक्का आहे.

सहा डिसेंबरसाठी कट: डॉ. उमर नबी याला दिल्लीमध्ये ६ डिसेंबर रोजी मोठा हल्ला घडवून आणायचा होता. या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. डॉ. नबी पुलवामातील आहे. जैशे मोहंमद या संघटेच्या काही भूमिगत कार्यकर्त्यांच्याही तो संपर्कात होता, असे तपासात पुढे आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; युरीला ‘भायलो’ म्हणणारे बनले युरी समर्थक !

Helmet Compulsion: बाईकवरून गोव्याला येताय? मागे बसणाऱ्यासाठीही आता हेल्मेटसक्ती; स्पीड डीटेक्शन यंत्रणा आणणार वापरात

Sateri Ravalnath Temple: सातेरी-रवळनाथ देवस्थानातील वाद मिटेना! पूजेसाठी भटजींची नेमणूक; तोडगा न निघाल्याने मामलेदारांचा निर्णय

Goa Winter: राज्यात पुढील 4 दिवस थंडीचे! वेधशाळेचा इशारा; दाबोळीत 17.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Goa Air Pollution: गोव्यासाठी धोक्याची घंटा! पर्वरी, पणजी परिसरात घसरली हवेची गुणवत्ता; नागरिकांच्या आरोग्याला धोका

SCROLL FOR NEXT