5 shooters of kala jatheri lawrence bishnoi gang Dainik Gomantak
देश

दिल्ली पोलिसांनी उधळला मोठा कट; काला जाथेडी-लॉरेन्स बिश्नोई टोळीचे पाच शूटर गजाआड

Delhi Police Arrested 5 Shooters: दिल्ली पोलिसांनी एक मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी काला जाठारी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या पाच शूटर्संना अटक केली आहे.

Manish Jadhav

Delhi Police Arrested 5 Shooters: दिल्ली पोलिसांनी एक मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी काला जाथेडी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या पाच शूटर्संना अटक केली आहे. हे सर्व शूटर हरियाणाचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या शूटर्संनी प्रतिस्पर्धी टोळीतील काही लोकांना ठा मारण्याची योजना आखली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांचा कट हाणून पाडला आहे. याबाबत माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या पाच शूटर्संकडून अत्याधुनिक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

याआधी बिहारमधून लॉरेन्स विश्नोई टोळीच्या दोन शूटर्संनाही अटक करण्यात आली होती. सुनीव बरोलिया आणि शाहनवाज शाहिद अशी त्यांची नावे असून त्यांना मुझफ्फरपूर येथून अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, त्यानंतर सीतामढी कोडवरील बसमधून दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनीच बाज टोळीतील आणखी पाच जणांना पोलिसांनी पकडले.

दरम्यान, गँगस्टर काला जाथेडी हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहकारी आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे आणि 12 मार्चला तो लेडी डॉन अनुराधा चौधरीसोबत लग्न करणार आहे. त्यासाठी त्याला 6 तासांचा पॅरोलही मिळाला आहे. दिल्लीतील द्वारका येथे हा विवाहसोहळा पार पडणार असून, त्यावर सुमारे 200 पोलिसांचे लक्ष राहणार आहे. याशिवाय, येथील वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनाही आयडी देण्यात येणार आहेत.

दुसरीकडे, काला जाथेडीला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर खून, अपहरण, दरोडा, खंडणी अशा गुन्ह्यात गुन्हा दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काला जाठारी यापूर्वी केबल ऑपरेटर म्हणून काम करत होता. पण त्यानंतर 2004 मध्ये त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आणि काही वर्षांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT