Shabbir Ahmed Lone arrest Dainik Gomantak
देश

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Shabbir Ahmed Lone arrest: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याच्या छायेखाली असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कामगिरी फत्ते केली आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याच्या छायेखाली असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कामगिरी फत्ते केली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लश्कर-ए-तैयबा' (LeT) चा सक्रिय सदस्य शब्बीर अहमद लोन याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपासात समोर आले आहे की, हा दहशतवादी बांगलादेशात बसून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सांगण्यावरून भारतात मोठ्या घातपाताचा कट रचत होता. या अटकेमुळे दिल्लीतील लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील ठिकाणांवर होणारा संभाव्य हल्ला टळला असल्याचे मानले जात आहे.

शब्बीर अहमद लोन हा लश्करचा केवळ एक सामान्य कार्यकर्ता नसून, तो थेट हाफिज सईद आणि झकी-उर-रहमान लखवी यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्याने पाकिस्तानमधील मुजफ्फराबाद येथील तळावर 'दौरा-ए-आम' आणि 'दौरा-ए-खास' असे प्रगत दहशतवादी प्रशिक्षण घेतले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये दिल्ली पोलिसांनी ज्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता, त्याचा मास्टरमाइंड आणि हँडलर हा शब्बीरच होता. बांगलादेशातून तो भारतात अवैध घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचे जाळे विणत होता.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. शब्बीर बांगलादेशात राहणाऱ्या अवैध नागरिकांना लक्ष्य करून त्यांचे 'ब्रेनवॉश' करायचा. त्यांना कट्टरपंथी बनवून भारतात पाठवले जात असे. या दहशतवाद्यांना भारतात लपण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रे पुरवली जात असत. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी हे दहशतवादी 'एनक्रिप्टेड' ॲप्सचा वापर करत होते, जेणेकरून सुरक्षा यंत्रणांना त्यांचा सुगावा लागू नये. नुकत्याच पकडलेल्या ८ लोकांपैकी ७ जण बांगलादेशी नागरिक होते, जे शब्बीरच्या इशाऱ्यावर काम करत होते.

शब्बीर अहमद लोनचा गुन्हेगारी इतिहास जुना आहे. २००७ मध्येही दिल्ली पोलिसांनी त्याला एके-४७ रायफल आणि ग्रेनेड्ससह अटक केली होती. त्यानंतर २०१८ पर्यंत तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून बांगलादेशात गेला आणि तिथून त्याने पुन्हा आपले दहशतवादी नेटवर्क सक्रिय केले. दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी पूर्ण झाली होती आणि मोठा स्फोट घडवण्याची त्यांची तयारी होती. मात्र, दिल्ली पोलिसांच्या तत्परतेमुळे हा मोठा कट उधळला गेला असून शब्बीर आता पुन्हा पोलिसांच्या कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT