Delhi: No action against 'those' students - Manish Sisodia Dainik Gomantak
देश

Delhi: 'त्या' विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई नको- मनीष सिसोदिया

दिल्ली(Delhi) सरकारच्या कोणत्याही विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे(Delhi) उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांनी दिल्ली सरकारविरोधात वक्तव्य करणार्‍या विद्यार्थ्याविरूद्ध कारवाई न करण्यास सांगितले आहे. हे वक्तव्य विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात केले होते. आणि त्यानंतर लागेचच आंबेडकर विद्यापीठ दिल्ली(AUD) प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई करत विद्यार्थ्याला दंड ठोठावला होता.आणि आता याच संदर्भात मनीष सिसोदिया यांनी महाविद्यालयीन प्रशासनाला यासंदर्भात कारवाई न करण्यास सांगितले आहे.

याबाबत बोलताना मनीष सिसोदिया म्हणाले की, विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित स्थान असले पाहिजे. जिथे विद्यार्थी आपला आवाज उठवू शकतात. जरी त्यांची मते सरकारच्या विरोधात आहेत. आवाज दाबणे चांगले नाही. विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहे. जर आपण त्यांना विद्यापीठात बोलण्याची संधी दिली नाही तर आम्ही त्यांना हि संधी कुठे भेटणार आहे ?

पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांकडून शासनाचे मत भिन्न असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याला स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल शिक्षा होऊ नये. जर आपण विद्यार्थ्यांना आवाज उठविण्याची संधी दिली नाही तर आपण देशासाठी एक अंधुक भविष्य घडवू, ज्यामध्ये लोकांना अन्यायविरूद्ध बोलण्याची हिम्मत होणार नाही.

जर देशातील राजकीय नेत्यांविरोधात टीका झाली नाही तर देशात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही निर्माण होईल. दिल्ली सरकारच्या कोणत्याही विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी मनीष सिसोदियांनी प्रधान सचिवांना सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT