Delhi High Court reprimanded A person who seeks divorce because his wife does not have physical relations. Dainik Gomatak
देश

पत्नी शारीरिक संबंध ठेवत नाही म्हणून घटस्फोट मागणाऱ्याला हायकोर्टाने फटकारले

पतीने असा दावा केला होता की, त्याची पत्नी काहीतरी बहाणा करत त्याला एकटे सोडत असे आणि तिला फक्त तिचे कोचिंग सेंटर चालविण्यात रस होता.

Ashutosh Masgaunde

Delhi High Court reprimanded A person who seeks divorce because his wife does not have physical relations:

विवाहित जोडप्यांमधील चिडचिड, किरकोळ बाचाबाची, विश्वासाचा अभाव आणि शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीचा नकार याला मानसिक क्रूरता समजू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करताना सांगितले.

पत्नीविरुद्ध पतीच्या याचिकेवर घटस्फोट मंजूर करणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करताना उच्च न्यायालयाने सोमवारी ही टिप्पणी केली.

पतीने मानसिक क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट मागितला होता. पतीने पत्नीला सासरी राहण्यास स्वारस्य नसल्याचा आरोप केला होता.

पतीने तिच्या माहेरच्या घरी 'घर जावई' म्हणून राहावे अशी तिची इच्छा आहे. तसेच ती शारीरिक संबंध ठेवण्यासही सतत नकार देते असे आरोप पतीने केले होते.

या दोघांनी 1996 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते आणि 1998 मध्ये या दोघांना एक मुलगी झाली होती.

पतीने असा दावा केला होता की, त्याची पत्नी काहीतरी बहाणा करत त्याला एकटे सोडत असे आणि तिला फक्त तिचे कोचिंग सेंटर चालविण्यात रस होता.

पतीने असाही आरोप केला होता की, त्‍याची पत्‍नी त्‍याला शरीरसंबंध ठेवण्‍यास सतत नकार द्यायची.

लैंगिक संबंधास नकार देणे हा मानसिक क्रौर्याचा एक प्रकार मानला जाऊ शकतो, पण याला तेव्हाच मानसिक क्रूरता मनता येते जेव्हा तो सतत, जाणूनबुजून आणि बराच काळ असतो. मात्र, अशा संवेदनशील आणि नाजूक विषयाला सामोरे जाताना न्यायालयाने अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती मनोज जैन

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, असे आरोप केवळ अस्पष्ट विधानांच्या आधारे सिद्ध केले जाऊ शकत नाहीत, विशेषत: जेव्हा विवाह विधिवत सोहळ्याद्वारे झाला होता.

खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, पती त्याच्या विरोधात झालेली मानसिक क्रूरता सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि सध्याचे प्रकरण हे केवळ वैवाहिक बंधनातील सामान्य मतभेदाचे प्रकरण आहे.

खंडपीठाने म्हटले की, "पत्नीचे आचरण असे कोणतेही सकारात्मक संकेत नाहीत की, तिच्या पतीला तिच्यासोबत राहणे शक्य नव्हते. त्यामुळे किरकोळ चिडचिड आणि विश्वासाचा अभाव याला मानसिक क्रूरता म्हणता येत नाही"

न्यायालयाने असेही म्हटले आहे की, "पती-पत्नीमध्ये विश्वास आणि आपुलकीचा अभाव होता पण असे असूनही ते दोघेही कुटुंबाला वाचवण्यासाठी मेहनत घेत होते. केवळ पत्नीने तिच्या पतीप्रमाणेच तक्रारीच्या निवारणासाठी न्यायालयात धाव घेतल्याने, हे क्रौर्याला प्रोत्साहन देण्यासारखे नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT