Delhi High Court Dainik Gomantak
देश

Delhi HC ने फेटाळला सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज, 'तुरुंगातून सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड...',

Satyendar Jain Bail Plea: ते तुरुंगाबाहेर आल्यास खटल्याशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करु शकतात, असे सांगत उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली.

Manish Jadhav

Delhi HC Dismisses Satyendar Jain Bail Plea: मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला.

आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सत्येंद्र जैन यांच्या प्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, ते एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. ते तुरुंगाबाहेर आल्यास खटल्याशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करु शकतात, असे सांगत उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली.

दरम्यान, सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या वर्षी 30 मे रोजी मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर 4 कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

दुसरीकडे, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी सहआरोपी वैभव जैन आणि अंकुश जैन यांचा जामीन अर्जही फेटाळला आहे. मात्र, याप्रकरणी न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सांगितले की, सत्येंद्र जैन यांची जामीन याचिका फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात कोणतीही बेकायदेशीरता किंवा कोणतीही त्रुटी नाही. विशेष म्हणजे, कनिष्ठ न्यायालयाने 2022 मध्ये सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

यानंतर, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन यांच्या वकिलाने 17 नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता आणि या याचिकेत तिन्ही आरोपींनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते.

या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर, ईडी आणि आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) नेत्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने 21 मार्च रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT