Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिलासा मागणं पडलं महागात; HC ने ठोठावला 75 हजारांचा दंड

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे.

Manish Jadhav

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने ही जनहित याचिका केवळ फेटाळलीच नाही तर याचिकाकर्त्याला 75 हजारांचा दंडही ठोठावला.

केजरीवाल यांना सर्व फौजदारी खटल्यांमध्ये अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. जोपर्यंत केजरीवाल मुख्यमंत्री पदावर आहेत किंवा खटला पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सर्व प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा, असे या जनहित याचिकेत म्हटले होते. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे एक्टिंग चीफ जस्टिस मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपीठाने म्हटले की, ''उच्च पदावर असलेल्या व्यक्तीविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यात न्यायालय अंतरिम जामीन देऊ शकत नाही. न्यायालयाच्या आदेशावरुन ते न्यायालयीन कोठडीत आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे.''

न्यायालयाने पुढे म्हटले की, 'जनतेचे सरंक्षक असल्याच्या याचिकाकर्त्याच्या दाव्याला कोणताही आधार नाही.' याचिकाकर्त्याकडे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या वतीने कोणतेही वैयक्तिक बाँड सादर करण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी नाही. केजरीवाल यांच्याकडे खटला दाखल करण्याची साधने आणि संसाधने आहेत आणि त्यांनी या न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात तसे केले आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने पुढे म्हटले की, ''यापूर्वी दाखल केलेल्या अशाप्रकारच्या याचिका फेटाळण्यात आल्या होत्या आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.'' विशेष म्हणजे, केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राहुल मेहरा यांनीही या याचिकेला विरोध केला. याला त्यांनी पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. याचिकाकर्त्याने दावा केला की, ते भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT