Delhi High Court  Dainik Gomantak
देश

कुटुंबासमोर सेक्स लाइफबद्दल बोलणे, पतीला जाहीररित्या नपुंसक म्हणणे 'मानसिक क्रौर्य': उच्च न्यायालय

Delhi High Court: घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

Manish Jadhav

Delhi High Court: घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पतीला जाहीरपणे नपुंसक म्हणणे किंवा शारीरिक संबंधांबद्दल बोलणे हे 'मानसिक क्रौर्य' असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पत्नी चिडचिडी स्वभावाची असून छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडण करत असल्याचा आरोप पतीने केला होता. ती अतिशय असभ्य रीतीने बोलते, असेही तो म्हणाला.

दरम्यान, न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर पतीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर केला. तत्पूर्वी, पतीची घटस्फोटाची याचिका फॅमिली कोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने म्हटले की, 'आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की, पत्नीच्या वतीने सर्वांसमोर पतीचा अपमान करणे आणि त्याला नपुंसक म्हणणे आणि कुटुंबातील सदस्यांसमोर सेक्स लाइफबद्दल उघडपणे बोलणे याला अपमानास्पद कृत्य म्हटले जाऊ शकते. त्यामुळे याचिकाकर्त्याला (पती) मानसिक क्रौर्याला सामोरे जावे लागले.' दरम्यान, या जोडप्याने 2011 मध्ये लग्न केले होते.

लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, आयव्हीएफ प्रक्रियेतूनही जोडप्याला मूल होऊ शकले नाही, त्यामुळे दोघांमध्ये मतभेद सुरु झाले होते. पतीने आरोप केला की, पत्नी सतत त्याला नपुंसक म्हणत. सर्वांसमोर त्याचा अपमान करत होती. त्यामुळे त्याला त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या सुनावणीदरम्यान म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT