Delhi CM Rekha Gupta attack Dainik Gomantak
देश

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Delhi Chief Minister Rekha Gupta attacked: समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित राजेशचे नातेवाईक तुरुंगात आहेत. यासंबधित तक्रार घेऊन तो जनात दरबारात आला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

Delhi CM Assault News

नवी दिल्ली: मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर ३५ वर्षीय व्यक्तीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्ता यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या जनता दरबारात बुधावारी (२० ऑगस्ट) ही घटना घडली. संशयित व्यक्तीनी गुप्ता यांच्या कानाखाली मारल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, भाजप नेते विरेंद्र सचदेवा यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

हल्लेखोर व्यक्तीची ओखळ पटली असून, तो राजकोट येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. राजेश भाई खिमजी भाई सखारिया असे या संशयिताचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित राजेशचे नातेवाईक तुरुंगात आहेत. यासंबधित तक्रार घेऊन तो जनात दरबारात आला होता. राजकोट पोलिसांनी हल्लेखोर राजेश याच्या आईला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुलगा राजेश मानसिक दृष्या स्थिर नसल्याचे त्यांच्या आईने पोलिसांना सांगितले आहे. शिवाय तो दिल्लीला जाऊन असे काही करेल याची कल्पना नसल्याचे देखील आईने पोलिसांना सांगितले. भटक्या कुत्र्यांबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तो दिल्लाला गेल्याचे देखील आईने पोलिसांना सांगितले.

संशयित राजेशला चौकशीसाठी काही दिवस ताब्यात ठेवले जाणार आहे.दिल्ली पोलिसांनी गुजरात पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली असून, अधिक चौकशी केली जात आहे.

दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, त्याने हल्ला का केला? याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, हल्ला झाल्यानंतर देखील रेखा गुप्ता यांनी जनता दरबार सुरु ठेवत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. सचदेवा यांनी रेखा गुप्ता यांचे स्ट्राँग महिला म्हणून कौतुक केले.

Atishi X Post

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिषी यांनी रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. "रेखा गुप्ता यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय आहे. लोकशाहीत असहमती आणि विरोधाला जागा असते पण, हिंसेला अजिबात नाही. दिल्ली पोलिस दोषींवर कडक कारवाई करेल अशी आशा आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित असतील अशी आशा करते," असे आतिषी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: कळंगुट पंचायतीची मोठी कारवाई! 22 अतिक्रमणांवर हातोडा; मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात

Bits Pilani: बंदी असलेले ‘सिंथेटिक्‍स ड्रग्‍स’ मिळाले कसे? बिट्स कॅम्‍पसमध्‍ये पोलिस तैनात; ‘स्‍विगी बॉईज्‌’वर संशयाची सुई

Rashi Bhavishya 12 September 2025: घाईघाईत निर्णय घेऊ नका, संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील; मानसिक शांततेसाठी विश्रांती घ्या

Samsung Galaxy F17 5G: सॅमसंगचा धमाका! दमदार बॅटरी आणि शानदार फीचर्ससह स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि बरच काही...

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई! 10 नक्षलवादी ठार, 1 कोटींचा इनाम असणारा कमांडर बालकृष्णही ढेर

SCROLL FOR NEXT