Ghazipur Border Dainik Gomantak
देश

11 महिन्यांपासून बंद असलेल्या दिल्लीच्या सीमा उघडण्याचे काम सुरु

यातच आता दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर आणि दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवरील (Ghazipur border) बॅरिकेड्स हटवून सिमेंटचा अडथळा दूर करण्याचे काम सुरु झाले आहे.

दैनिक गोमन्तक

देशात मागील 11 महिन्यांपासून मोदी सरकारने (Modi government) आणलेल्या कृषी कायद्यांच्या (Agricultural laws) विरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने हरियाणा (Haryana), पंजाब, उत्तप्रदेशसह इतर अनेक राज्यातील शेतकरी यामध्ये सहभागी झाले आहेत. यातच आता दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर आणि दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवरील (Ghazipur border) बॅरिकेड्स हटवून सिमेंटचा अडथळा दूर करण्याचे काम सुरु झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत दोन्ही सीमेवरील बॅरिकेड्स आणि पक्के बांधकाम पूर्णपणे हटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी यूपी गेटवर एक चेकपोस्ट लावला आहे, जे की त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना येथून पूर्णपणे हटवल्याशिवाय मार्ग मोकळा होणे शक्‍य नसल्याचे सांगण्यासाठी दिल्ली पोलिस आपले बॅरिकेड हटवत आहेत. मेरठ एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर आंदोलकांनी चेक पोस्ट देखील लावले आहेत.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाचे मुख्य ठिकाण असलेल्या दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर लेन उघडल्यानंतर आता दिल्ली पोलिस यूपी गेटवर ( Ghazipur Border) अशाच प्रकारे रस्ता खुला करत आहेत. दिल्ली पोलिसांचे जवान शुक्रवारी सकाळपासून गाझीपूर सीमेवरील बॅरिकेड्स हटवत आहेत. पूर्व जिल्हा पोलीस उपायुक्त प्रियांका कश्यप यांनी दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवरुन बॅरिकेड्स हटवण्याची कारवाई केल्याची पुष्टी केली आहे. काही वेळानंतर येथील बॅरिकेड्स पूर्णपणे हटवले जातील. सध्या आम्ही NH-9 उघडत आहोत, त्यानंतर NH-24 देखील उघडण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर दिल्लीच्या बाजूने रोहतक रस्त्याचा काही भाग खुला केला जात आहे. टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील बॅरिकेड्स हटवल्यानंतर दिल्ली ते यूपी आणि हरियाणा दरम्यानचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

NH-9 आणि NH-24 वर वाहनांचा वेग वाढेल

दिल्ली पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवरील बॅरिकेड्स हटवल्यानंतर गाझियाबाद ते दिल्लीचा रस्ता खुला होऊ शकतो. गाझीपूर सीमेवरील बॅरिकेड हटवल्यानंतर 11 महिन्यानंतर गाझियाबाद ते दिल्लीपर्यंतची वाहतूक पुन्हा सुरळीत होणार असल्याने सर्वसामान्यांनी आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शासनाचा आदेश आहे, त्यामुळे आम्ही बॅरिकेड्स हटवून मार्ग खुला करत आहोत. 26 जानेवारी रोजी कृषी कायदा विरोधी आंदोलकांनी ट्रॅक्टर परेड काढत राजधानी दिल्लीत प्रवेश केला होता. त्यानंतरच पोलिसांनी बॅरिकेड लावून सीमा बंद केली होती.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या निदर्शनामुळे बंद झालेल्या रस्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे की, तीनही केंद्रीय कृषी कायदे स्थगित असताना शेतकरी आंदोलन का करत आहेत?

अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांवर टिकरी सीमेवर तसेच यूपी गेटवर वाहतूक लवकर पूर्ववत करण्यासाठी दबाव होता. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवरील बॅरिकेडही हटवण्यात येत आहेत. त्याचवेळी मात्र कुंडली सीमेवर तसा प्रयत्न होताना दिसत नाही, टीकरी आणि गाझीपूर सीमेवर ज्या प्रकारच्या हालचाली वाढल्या आहेत.

यूपी गेटवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली

28 नोव्हेंबर 2020 पासून यूपी गेटवर दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व लेन आंदोलकांच्या ताब्यात आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून पोलिसांनी येथे बॅरिकेड्स लावले होते. गाझियाबादचे पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकरी सीमेवर झालेल्या गोंधळानंतर यूपी गेटवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, दिल्ली पोलिसांनी वाहतूक रोखली आहे. आता दिल्ली पोलिसांकडून बहादूरगडकडे जाणाऱ्या गल्लीतून दगड हटवून साफसफाई केली जात असून, एक-दोन दिवसांत हा रस्ता खुला करुन पोलिस वाहतूक पूर्ववत करतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर 2020 पासून पंजाबमधील आंदोलकांनी मोठ्या संख्येने दिल्लीकडे मोर्चा काढला तेव्हापासून ही सीमा बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT