Delhi blast latest update Dainik Gomantak
देश

Delhi Blast: दहशतवाद्यांचा 'मास्टरप्लॅन' उधळला! कटात 4 प्रमुख शहरे निशाण्यावर; 'सिरियल-ब्लास्ट'चे 8 धक्कादायक खुलासे समोर!

Terrorist Masterplan Delhi: नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात आता मोठे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत

Akshata Chhatre

नवी दिल्ली: १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात आता मोठे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांनी ३२ जुन्या गाड्यांमध्ये स्फोटके भरून अनेक ठिकाणी समन्वयित हल्ले करण्याची योजना आखली होती.

कार स्फोटाचा आरोपी 'डॉ. उमर'ची ओळख निश्चित

दिल्ली पोलिसांनी डीएनए चाचणीद्वारे कार स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख निश्चित केली आहे.

ओळख: फॉरेन्सिक डीएनए चाचणीत स्फोटात मरण पावलेला व्यक्ती डॉ. उमर उन नबी हाच असल्याचे सिद्ध झाले. त्याच्या आईच्या डीएनए नमुन्याशी त्याची चाचणी जुळली.

ड्रायव्हरची ओळख: स्फोटानंतर उमरचा पाय स्टिअरिंग व्हील आणि ॲक्सिलरेटरमध्ये अडकलेला आढळला, ज्यामुळे तो स्फोटाच्या वेळी गाडी चालवत होता हे स्पष्ट झाले. डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल आणि शाहीन हे पूर्वीच्या दहशतवादी प्रकरणांशी जोडलेले आहेत आणि आता त्यांच्यावर अधिक तपास सुरू आहे.

३२ जुन्या गाड्यांमध्ये स्फोटके भरण्याची योजना

गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनुसार, आरोपींनी आय२० आणि इकोस्पोर्ट या गाड्यांमध्ये स्फोटक भरून हल्ले करण्याची तयारी सुरू केली होती.

योजनेचा तपशील: "आय२० आणि इकोस्पोर्टनंतर, ३२ हून अधिक जुन्या गाड्या स्फोटके भरण्यासाठी तयार करण्याची तयारी सुरू होती," अशी माहिती सूत्रांनी दिली.

इकोस्पोर्ट जप्त: स्फोटाशी जोडली गेलेली लाल रंगाची इकोस्पोर्ट कार फरीदाबादच्या खंडवाली जिल्ह्यातून जप्त करण्यात आली आहे. ही कार डॉ. उमर उन नबी यांच्या नावावर नोंदणीकृत होती.

२० लाख रुपयांचा निधी, IED साठी खत खरेदी

दहशतवादी कारवायांसाठी आरोपींनी संयुक्तपणे सुमारे २० लाख रोख जमा केले होते. हा निधी उमर नबीकडे ऑपरेशनल खर्चासाठी देण्यात आला होता.

IED तयार करण्यासाठी गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या भागातून सुमारे २० क्विंटल एनपीके खत (NPK fertiliser) खरेदी करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला. एनपीके खताचा उपयोग स्फोटक पदार्थ काढण्यासाठी केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, उमर आणि डॉ. मुजम्मिल यांच्यात पैशांवरून वादही झाल्याचे तपासात समोर आले आहे.

'कोडवर्ड' असलेली डायरी पोलिसांच्या हाती

तपास यंत्रणांना आरोपी डॉ. उमर आणि डॉ. मुजम्मिल यांच्या खोल्यांतून त्यांच्या डायऱ्या सापडल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये कोडवर्ड्स (Code words) आहेत, जे तपासकर्ते जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

डायरीमध्ये ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखांचा उल्लेख आहे, ज्यामुळे याच दरम्यान हल्ल्याचे नियोजन सुरू होते, हे स्पष्ट होते. डायरीत सुमारे २५ लोकांची नावे होती, त्यापैकी बहुतेक जम्मू आणि काश्मीर आणि फरीदाबादचे रहिवासी होते. या नोंदींवरून हा स्फोट एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होते.

एकाचवेळी ४ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटाची योजना

प्राथमिक तपासात असेही सूचित झाले आहे की, आरोपी गटांचा हेतू जोड्यांमध्ये फिरून, एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा होता. "सुमारे आठ संशयितांनी चार ठिकाणी साखळी स्फोट (Serial Blast) घडवण्याची योजना आखली होती. त्यांनी दोघांच्या जोडीने चार शहरांमध्ये जाण्याची योजना आखली होती. प्रत्येक गटाला अनेक IED घेऊन जायचे होते," असे तपास संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.

डॉ. मुजम्मिलचा २०१२-२०२२ दरम्यान अन्सार गझवत-उल-हिंद (ISIS ची उपशाखा) या दहशतवादी संघटनेकडे कल वाढला होता. २०३३ आणि २०२४ मध्ये जप्त केलेली शस्त्रे याच मॉड्यूलने स्वतंत्र दहशतवादी गट बनवण्याच्या तयारीसाठी मिळवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NIA Raids: अल-कायदाच्या कटाचा पर्दाफाश! NIA ची 5 राज्यांमध्ये छापेमारी; बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांचे षडयंत्र

Bus Accident: भीषण अपघाताने हाहाकार! पिकअपला धडकून बस खोल दरीत कोसळली, 37 ठार, 24 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

Terrorist: एखादी व्यक्ती स्वतःचा जीव देऊन इतरांना मारण्यासाठी का प्रवृत्त होते? कारण काय? दारिद्र्य, राजकारण की कट्टरता?

कॅसिनोनंतर आता 'स्पा'चा बाजार! पणजी 'थायलंड'च्या वाटेवर? मंत्री म्हणतात, 'हे स्पा माझे आहेत का?' - संपादकीय

Goa Live News: विकसित गोवा 2037 चा आराखडा 19 डिसें. रोजी गोव्यासमोर

SCROLL FOR NEXT