Defense Minister Rajnath Singh  Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: राजनाथ सिंह म्हणाले, 'POK भारतातच भाग, युद्ध झाले तर...'

Defense Minister Rajnath Singh: जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर ( POK) चा भाग परत मिळवण्याची वकिली करताना सिंग म्हणाले की, 'पीओके हा भारताचा भाग आहे आणि भारताचाच राहील. जो कोणी आमच्यावर वाईट नजर टाकेल त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार आहे.' युद्ध झाले तर भारतच विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "मला आत्मविश्वासाने सांगायचे आहे की, जर कोणत्याही परकीय शक्तीने आमच्यावर वाईट नजर टाकली आणि युद्ध झाले तर आम्हीच विजयी होऊ."

ते पुढे म्हणाले की '1947 पासूनच्या सर्व युद्धांमध्ये भारताने (India) पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला आहे. परंतु कडव्या पराभवानंतर पाकिस्तानने प्रॉक्सी वॉर सुरु केले. सशस्त्र सेना भविष्यातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाहीही सिंग यांनी देशाला दिली. ते पुढे असेही म्हणाले की, 'पाकिस्तान आणि चीनसोबतच्या (China) युद्धात जम्मू-काश्मीरमधील जनता आपल्या सैन्याच्या पाठीशी उभी होती.'

बाबा अमरनाथ इकडे, शारदा कशी पलीकडे?

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. शारदा पीठाचा संदर्भही सिंहांनी यावेळी बोलताना दिला, जिथे सरस्वती देवीचे मंदिर आहे, ज्याला शारदा पीठ म्हणूनही ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT