Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
देश

DeepFake Row: ''डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यास वापरकर्ते अन् कंपन्यांवर कारवाई...'', अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले!

DeepFake Row: बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार लवकरच डीपफेकवर कायदा करणार आहे.

Manish Jadhav

DeepFake Row: पीएम मोदींसह अनेक बड्या व्यक्तींनी डीपफेकबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत एआय कंपन्यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार लवकरच डीपफेकवर कायदा करणार आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, डीपफेक लोकशाही (Democracy) देशांसाठी एक नवीन धोका म्हणून उदयास आला आहे. यासाठी कंपन्या जबाबदार असतील. आजच्या बैठकीत चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये डीपफेक कसे शोधता येतील? अशी सामग्री व्हायरल होण्यापासून रोखता येईल का? डीपफेकबाबत प्लॅटफॉर्म आणि अधिकाऱ्यांना अलर्ट करुन कारवाई करता यावी यासाठी मॉनिटरिंग सिस्टिम उभारण्याचीही चर्चा आहे.

सरकार आणि कंपन्यांना एकत्र काम करावे लागेल

डीपफेक रोखण्यासाठी सरकार (Government), मीडिया आणि कंपन्यांना एकत्र काम करावे लागेल, असे मंत्री म्हणाले. वैष्णव म्हणाले की, अशा सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी नवीन नियमांची गरज आहे.

यावर तातडीने काम सुरु होणार असून येत्या काही आठवड्यांत त्यासंबंधीचा मसुदा तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. याची जबाबदारी डीपफेक वापरकर्ते आणि कंपन्यांची असेल, असे ते म्हणाले. त्यासाठी नवीन कायदे किंवा सध्याच्या नियमांमध्येही सुधारणा करता येऊ शकतात.

पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली

काही दिवसांपूर्वी पीएम मोदींचा गरबा खेळतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. दरम्यान, काल झालेल्या G-20 च्या व्हर्च्युअल बैठकीतही याचा उल्लेख झाल्याचे पीएम मोदींनी सांगितले. गांभीर्य दाखवत त्यांनी हा प्रकार धोकादायक ठरु शकतो, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, एआयच्या गैरवापराबाबत जगभरात चिंता वाढली आहे.

या बाबतीत भारताचा स्पष्ट विचार आहे की, आपण त्याच्या जागतिक नियमनाबाबत एकत्र काम केले पाहिजे. डीपफेक समाजासाठी आणि व्यक्तीसाठी धोकादायक आहेत. पंतप्रधान पुढे म्हणाले होते की, पुढील महिन्यात इंडिया ग्लोबल एआय भागीदारी आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य देखील अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT