Court Dainik Gomantak
देश

पत्नी असूनही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे योग्य की अयोग्य? हायकोर्टाने नोंदवली महत्त्वपूर्ण टिप्पणी

High Court Rejected The Petition For Security: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या जोडप्याला पोलिस संरक्षण देण्याची मागणी फेटाळून लावली.

Manish Jadhav

High Court Rejected The Petition For Security: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या जोडप्याला पोलिस संरक्षण देण्याची मागणी फेटाळून लावली.

या प्रकरणात न्यायालयाने म्हटले की, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे हे आयपीसी कलम 494-495 अंतर्गत येते. न्यायमूर्ती कुलदीप तिवारी या खटल्याची सुनावणी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने आधीच एका महिलेशी लग्न केले आहे आणि त्यानंतरही तो दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

घटस्फोटाशिवाय दुसऱ्या महिलेसोबत राहणे हा गुन्हा आहे

दरम्यान, पहिल्या पत्नीला घटस्फोट (Divorce) न देता दुसऱ्या महिलेशी लग्न करणे किंवा महिलेसोबत राहणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते, असे न्यायालयाने म्हटले आहे. जो आयपीसी कलम 494-495 अंतर्गत गुन्हा आहे. अशा स्थितीत न्यायालयाने त्या व्यक्तीची सुरक्षेची मागणी फेटाळून लावली.

आयपीसीच्या कलम 494 नुसार द्विविवाह करणे हा गुन्हा आहे आणि या अंतर्गत जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा आणि दंड होऊ शकतो. या प्रकरणात न्यायालयाने असेही म्हटले की, संबंधित व्यक्ती आणि त्याच्या पत्नीमधील घटस्फोटाचा खटला फॅमिली कोर्टात सुरु आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या मागण्यांबाबत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते.

पहिल्या पत्नीच्या घरच्यांनी जीवे मारण्याची धमकी

न्यायालयाने सांगितले होते की, व्यक्तीच्या कुटुंबीयांनी व्यक्तीशी दुसऱ्या महिलेचे (Woman) संबंध मान्य केले आहेत. या व्यक्तीने महिलेच्या कुटुंबीयांवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र तो न्यायालयात कोणत्याही प्रकारचे आरोप सिद्ध करु शकला नाही. न्यायालयात साक्षीदार आणि पुरावे सादर न केल्यामुळे न्यायालयाने त्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची मागणी फेटाळून लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT