Kolkata High Court: कोलकाता उच्च न्यायालयात एक प्रकरण समोर आले आहे, ज्याला लोक भगवान शिव आणि त्यांच्या पवित्र श्रावण महिन्याशी जोडून पाहत आहेत.
खरे तर, कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जयसेन गुप्ता एका खटल्याचा निकाल नोंदवत होते, त्याचवेळी त्यांचे सहायक निबंधक कोर्टरुममध्येच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने उच्च न्यायालयाच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. या घटनेनंतर न्यायमूर्तींनी परत येऊन आपला निर्णय बदलला.
खरे तर, हे संपूर्ण प्रकरण मुर्शिदाबादच्या खिदिरपूरचे आहे. सुदीप आणि गोविंद या दोन व्यक्तींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरुन वाद सुरु आहे. या वर्षी मे महिन्यात दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. दोघांविरुद्धचे प्रकरण बेलडांगा पोलिसात (Police) पोहोचल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यानंतर त्यांचे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात पोहोचल्यानंतर दोघांनाही जामीन मिळाला.
दरम्यान, सुदीपच्या लक्षात आले की गोविंदने वादग्रस्त जमिनीवर शिवलिंग ठेवले होते. त्यानंतर सुदीपने उच्च न्यायालयात धाव घेत शिवलिंग हटवण्याची मागणी केली.
सुदीपने न्यायालयाला (Court) सांगितले की, मी यापूर्वी पोलिसांकडे कारवाईसाठी तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी माझे म्हणणे ऐकले नाही. दरम्यान, न्यायमूर्ती जयसेन गुप्ता या प्रकरणावर सुनावणी करत होते.
त्यावर गोविंदच्या वकिलाने सांगितले की, त्यांच्या अशिलाने शिवलिंग ठेवलेले नाही, तिथे उपस्थित असलेले शिवलिंग जमिनीतून वर आले आहे.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जयसेन गुप्ता यांनी शिवलिंग हटवण्याचा आदेश दिला. यानंतर ते खटल्याचा निकाल नोंदवत असताना अचानक त्यांचे सहाय्यक निबंधक न्यायालयातच बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.
यावेळी न्यायमूर्ती जयसेन गुप्ता यांनी थोडा ब्रेक घेतला. ते परत आल्यावर त्यांनी हा निर्णय रद्द करुन हा खटला आता कनिष्ठ न्यायालयात दिवाणी खटल्यातून चालवला जाईल, असा आदेश दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.