Kedarnath Dainik Gomantak
देश

केदारनाथमध्ये घोडे अन् खेचरांचे मृत्यू; भाविकांची गर्दी वाढली, सरकारने केले हात वर

केदारनाथच्या 19 किलोमीटर पदपथावरती भाविकांसाठी सुमारे पाच हजार खेचर आणि घोडे आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तराखंड (Uttarakhand) मधील केदारनाथ (Kedarnath) पदपथावर येणारी मंदाकिनी नदी दिवसेंदिवस घाण होत आहे. केदारनाथ पदपथावर घोडे आणि खेचरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मालक अथवा फेरीवाले त्यांना थेट मंदाकिनी नदीत फेकून देत आहेत, त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते आहे. आतापर्यंत 1.25 लाख यात्रेकरूंनी घोडा आणि खेचरांनी यात्रेचा प्रवास पूर्ण केला आहे, तर इतर यात्रेकरू हेलिकॉप्टरने आणि पायी धाम गाठले आहे. (Death of horses and mules in Kedarnath The crowd of devotees increased the government raised its hand)

केदारनाथच्या 19 किलोमीटर पदपथावरती भाविकांसाठी सुमारे पाच हजार खेचर आणि घोडे आहेत. हेलिकॉप्टर बुकिंगची सोय आहे, पण पुरेसे हेलिकॉप्टर नसल्याने बहुतांश लोक खेचरांवर धाम यात्रा पूर्ण करतात. अधिक पैसे मिळवण्यासाठी खेचरांना घेऊन दिवसातून तीन फेऱ्या केल्या जातात. कमी चारा आणि मेहनतीमुळे आतापर्यंत 100 हून अधिक खेचरांचे मृतदेह मंदाकिनी नदीमध्ये कुजत आहेत. त्यामुळे स्थानिकांमधील आणि प्रवाशांच्या आजारांचा धोका वाढत असल्याचे डॉ.प्रवीण पवार यांनी सांगितले.

बर्फवृष्टीनंतर यात्रा सुरू झाली, आणि त्यानंतर भाविकांची गर्दी झाली

2 दिवसांच्या बर्फवृष्टीनंतर बुधवारी पुन्हा एकदा केदारनाथ यात्रेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर हजारो भाविक पुन्हा केदारनाथकडे वळले. त्यामुळे पोलीस आणि मंदिर समितीला बंदोबस्तासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. शुक्रवारीही 30 हजारांहून अधिक भाविक केदारनाथ यात्रेला पोहोचले.

बेस कॅम्पवरून दिवसभर भुकेले आणि तहानलेले खेचर धावत आहेत

चालक आणि फेरीवाले गौरीकुंडातून खेचर-घोडे चालवत थेट केदारनाथ बेस कॅम्पवरच थांबतात, थोडासा हरभरा आणि भुसा खाऊन पुन्हा पायथ्याशी पळत आणल्याचे दिसून आले आहे. सर्व दावे करूनही पदपथावर कोणत्याही ठिकाणी घोडा आणि खेचरांसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

स्थानिक लोकांनी सांगितले की, मंदिर समितीने पावले उचलली

आजाराच्या भीतीने स्थानिकांनी खेचरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची मागणी मंदिर समितीकडे केली. दुसरीकडे याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनीही सांगितले आहे. खेचरांकडून जास्त फेऱ्या होऊ नयेत, याचीही प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे.

चारधाम : आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला

यंदा चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून 24 दिवसांत 84 जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने असे आवाहन केले आहे की ज्यांना गेल्या वर्षी कोरोना झाला होता आणि उपचारादरम्यान आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांनी जास्त प्रवास करू नये प्रवास टाळावा. सरकारी आकडेवारीनुसार, संपूर्ण चारधाम यात्रेदरम्यान 2019 मध्ये 90, 2018 मध्ये 102 आणि 2017 मध्ये 112 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सहरोगी सावध रहा

सहरोगी व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. केदारनाथ बद्रीनाथच्या थंड हवामानानुसार मैदानी भागातून येणाऱ्या यात्रेकरूंना जुळवून घेता आलेले नाही. बहुतेक भक्तांच्या मृत्यूचे कारण हायपोथर्मिया म्हणजेच (अति थंडी) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT