Dalai Lama Dainik Gomantak
देश

Dalai Lama 87th Birthday: 'जगाने भारताकडून प्रेम, अहिंसा अन् करुणा घ्यावी'

तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांनी 6 जुलै रोजी आपला 87 वा वाढदिवस साजरा केला.

दैनिक गोमन्तक

Dalai Lama's Famous Quotes On His 87th Birthday: जगाला प्रेम, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांनी 6 जुलै रोजी आपला 87 वा वाढदिवस साजरा केला. तमाम भारतीयांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इथे आपण त्यांचा वाढदिवस त्यांनी दिलेल्या संदेशासह त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या घटनांसह साजरा करत आहोत.

कोरोना नंतर दोन वर्षांनी वाढदिवस साजरा

कोरोनामुळे, यावेळी तब्बल दोन वर्षांनी तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांनी बुधवारी आपला 87 वा वाढदिवस साजरा केला. हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील मॅक्लॉडगंज येथील मुख्य बौद्ध मंदिरात त्यांनी तिबेटी रितीरिवाजांसह हा वाढदिवस साजरा केला. यावेळी हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आणि तिबेट सरकारचे निर्वासित माजी पंतप्रधान सामडोंग रिनपोचे हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या दीर्घायुष्याचीही कामना केली.

जेव्हा दलाई लामा चीनपासून वाचण्यासाठी भारतात पोहोचले

आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जगावर छाप पाडणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा आज 87 वा वाढदिलस साजरा करत आहेत. दुसरीकडे, मात्र त्यांचा जीवन प्रवास संघर्षांनी भरलेला आहे. दलाई लामा यांना 1959 मध्ये तिबेट सोडावे लागले. 62 वर्षांपूर्वी ते भारतात आले होते. चीनी सरकारच्या दडपशाहीमुळे त्यांना तिबेट सोडावे लागले. तेव्हापासून ते भारतात राहत आहेत. दलाई लामा 17 मार्च रोजी तिबेटची राजधानी ल्हासा येथून पायी भारतात (India) येण्यासाठी निघाले होते. तब्बल 15 दिवसांनी त्यांनी भारतात पाऊल ठेवले होते. त्यावेळी त्यांची कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे मार्च 1959 मध्ये संपूर्ण ल्हासामध्ये दलाई लामा यांच्या जीवाला धोका असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

दुसरीकडे, चिनी सरकार त्यांची हत्या करु शकते, अशी भीती होती. दरम्यान त्यांच्या सल्लागारांनी त्यांना लवकरात लवकर ल्हासा सोडण्यास सांगितले. त्याच वर्षी 17 मार्चच्या रात्री दलाई लामा आपल्या कुटुंबीयांसह वेश बदलून ल्हासा राजवाड्यातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील महिलाही पुरुषांच्या वेशात होत्या. दलाई लामा यांनी त्यांच्या 'माय लँड अँड माय पीपल, मेमोयर्स ऑफ दलाई लामा' या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केला आहे. चीन दलाई लामांना फुटीरतावादी मानतो.

दलाई लामा हे शांततेचे प्रतीक आहेत

बौद्ध धर्माचे अनुयायी दलाई लामा यांना करुणेचे प्रतीक मानतात. जगात प्रेम, शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या तिबेटी धर्मगुरुला 1989 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. दलाई लामांना जगभरातून सहानुभूती मिळाली असेल, परंतु ते अजूनही भारतात वनवासात जीवन जगत आहेत. दलाई लामा आणि चीन यांच्यातील 1950 च्या दशकात सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही. मात्र, आता त्यांना चीनपासून स्वातंत्र्य नकोय, तर स्वायत्तता हवी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. दलाई लामा यांचा जन्म पूर्व तिबेटमध्ये 6 जुलै 1935 रोजी तेन्झिन ग्यात्सो म्हणून एका शेतकरी कुटुंबात झाला. ते दोन वर्षांचे होताच, ल्हामो थोंडुपच्या बौद्ध भिक्षूंना आध्यात्मिक प्रतिके प्राप्त झाली. त्यानंतर, 13व्या दलाई लामांचे उत्तराधिकारी म्हणून, त्यांना 14 वे दलाई लामा म्हणून घोषित करण्यात आले.

दलाई लामाबद्दल अज्ञात तथ्य

दलाई लामा यांचा लहानपणापासूनच विज्ञानाकडे कल होता. मोकळ्या वेळेत त्यांना घड्याळे आणि कार दुरुस्त करायला आवडते.

  • मंगोलियन भाषेत 'दलाई' म्हणजे 'महासागर' आणि 'लामा' म्हणजे धर्माचा 'गुरु'.

  • ते त्यांच्या पूर्वसुरींमध्ये सर्वाधिक काळ जगणारे धार्मिक नेते आहेत.

  • 22 फेब्रुवारी 1940 रोजी स्वायत्त तिबेटची राजधानी ल्हासा (आताची चीन) येथे आयोजित एका समारंभात ते धर्मगुरुंच्या सिंहासनावर बसले.

  • एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, जर मी धर्मगुरु नसतो तर मी अभियंता झालो असतो.

  • मी रोज पहाटे 3 वाजता उठतो. यानंतर सकाळी 5 वाजेपर्यंत ध्यान करतो आणि मग मॉर्निंग वॉक.

  • मी दलिया आणि त्सांपाचा नाश्ता घेतो जे बार्ली-पिठाचा पारंपारिक तिबेटी पदार्थ आहे.

  • मी सकाळी बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करतो आणि दुपारी भक्तांना भेटतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT