Cyclone Dainik Gomantak
देश

Cyclone Sitrang: ऐन दिवाळीत 'सितरंग' चक्रीवादळाचा धोका, IMD चा अलर्ट

Cyclone Sitrang: भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Cyclone Sitrang: भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, 'सितरंग' चक्रीवादळमुळे काही राज्यांमध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेच्या दिवशी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे अनेक राज्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याचा हा इशारा पश्चिम बंगाल, ओडिशासह अनेक राज्यांसाठी आहे. चला, जाणून घ्या हवामानाची स्थिती...

IMD नुसार, सोमवारी म्हणजेच दिवाळीला पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशा (Odisha) या दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

'सितरंग' बंगाल आणि ओडिशामध्ये कहर करेल

कोलकाता येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक संजीव बंदोपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील उत्तर-24 परगणा आणि दक्षिण-24 परगणा जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर पश्चिम मेदिनीपूरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, 25 ऑक्टोबर (गोवर्धन पूजेच्या दिवशी) नादिया, उत्तर 24 परगणा आणि दक्षिण 24 परगणा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दोन्ही दिवशी कोलकाता, हावडा आणि हुगळीत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. त्याचवेळी, भुवनेश्वरमधील प्रादेशिक हवामान केंद्राने पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, मयूरभंज, जाजपूर, केओंझर, कटक आणि खुर्दा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

या राज्यांमध्येही मुसळधार पाऊस

दिवाळी आणि गोवर्धन पूजेच्या दिवशी अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात 24-26 ऑक्टोबर दरम्यान आणि मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 23-26 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT