Mocha Cyclone Dainik Gomantak
देश

Cyclone Mocha on Bay Of Bengal: 'मोचा' चक्रीवादळाचे भीषण वादळात रुपातंर, बंगालच्या किनारी भागात सतर्कतेचा इशारा

14 मे रोजी चक्रीवादळ मोचाने म्यानमारच्या किनारपट्टीवरील सिटवे येथे कहर केला. तसेच बंगालमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Cyclone Mocha on Bay Of Bengal: 'मोचा' चक्रीवादळाचे भीषण वादळात रूपांतर झाले आहे. तसेच, मोचा वादळ 9 किमी ताशी वेगानं उत्तरेकडे सरकत आहे.

रविवारी 14 मे रोजी मोचा चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यांवर धडकलं. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांचा किनारी भाग हाय अलर्टवर आहे.

पीटीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की, लाईव्ह गार्ड्स एनडीआरएफची पथकांसह दिघा-मंदारमणी किनारी भाग देखील सतर्क आहे. तसेच लोकांनी समुद्राजवळ किंवा समुद्रकिनारी जाऊ नये यासाठी हवामान विभागानं नियमावली जारी केली आहे.

नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन गटाचे 100 हून अधिक कर्मचारी बाक्खाली बीचवर तैनात केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरबनच्या तटबंदीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, तटबंदीच्या आजूबाजूचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

  • समुद्राजवळ लोकांना जाण्यास मनाई 

पोलीस आणि प्रशासनाने लोकांना समुद्राजवळ जाऊ नये यासाठी आवाहन करत आहे. गावागांवात लाऊडस्पीकरचा वापर करुन सातत्यानं प्रशासनाकडून लोकांना माहिती पुरवली जात आहे.

एनडीआरएफ टीमचे सदस्य विकास साधू म्हणाले की, आम्ही पर्यटकांना समुद्राजवळ जाऊ देत नाही, सध्या समुद्र खवळलेला असून जोरदार लाटा उसळत आहेत. आम्ही समुद्रकिनाऱ्यावरील हालचालींवर नियंत्रण ठेवत आहोत. आम्हाला पुढील काही तास सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

हे वादळ सोमवारी (15 मे) राज्यात धडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांतील किनारी भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोचा चक्रीवादळ कॉक्स बाजारपासून 250 किमी दक्षिणेकडे होतं. 

सिटवेमध्ये मोका चक्रीवादळाचा कहर 

डेली स्टारच्या वृत्तानुसार, रविवारी (14 मे) चक्रीवादळ मोकानं म्यानमारच्या किनारी भागांत असलेल्या सिटवेमध्ये कहर केला आहे. म्यानमारच्या सिटवेचा काही भाग जलमय झाला होता, तर ताशी 130 किमी वेगानं वारे वाहत होते.

अल जझिरानं दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच म्यानमारमध्ये झाड पडल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, NDRF च्या दुसऱ्या बटालियनचे कमांडंट गुरमिंदर सिंह यांनी सांगितलं की, मोखा चक्रीवादळाचं 12 मे रोजी तीव्र चक्रीवादळात आणि 14 मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल.

त्याचवेळी भुवनेश्वरमधील आयएमडीचे वरिष्ठ अधिकारी संजीव द्विवेदी यांनी अंदाज वर्तवला आहे की, 12 मे रोजी संध्याकाळी मध्य बंगालच्या उपसागरावर त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT