केरळच्या (Kerala) एर्नाकुलम (Ernakulam), इडुक्की (Idukki) आणि त्रिशूर (Thrissur) जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' (Orange alert) जारी करण्यात आला आहे. Dainik Gomantak
देश

'गुलाब' चक्रीवादळमुळे केरळ,आंध्रासह देशाच्या अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिशेने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस धुवांधार पावसाची (Rain) शक्यता आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि कोकणातील 7 जिल्ह्यांना उद्यापासून दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

केरळच्या (Kerala) एर्नाकुलम (Ernakulam), इडुक्की (Idukki) आणि त्रिशूर (Thrissur) जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' (Orange alert) जारी करण्यात आला आहे. तसेच इतर 11 जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. याशिवाय मंगळवारी कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 'गुलाब' चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम (Visakhapatnam) जिल्ह्यातील पेंडुरथी मंडळात जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सारीपल्ली गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पिके पाण्याखाली गेली आहेत.

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, काही भागात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भागात 'गुलाब' चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवरील गट्टा बंधाऱ्यात पाण्याची पातळी वाढली आहे. याबाबत बोलताना गजपती डीएम लिंगराज पांडा म्हणाले, आम्ही बॅरेज आणि पाण्याच्या पातळीचा आढावा घेतला आहे. ज्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा होती, तेथे पाणी पातळी सुरक्षित कशी राहील असा आमचा प्रयत्न आहे. उद्यापर्यंत पाऊस ओसरण्याची शक्याता आहे. त्यानंतर आम्ही धरणाचे दरवाजे बंद करू असे त्यांनी नमूद केले.

बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

गुलाब चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या भागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञांनी सांगितले की, सोमवारी म्यानमार किनाऱ्याजवळ चक्रीवादळ क्षेत्र तयार होऊ शकते, ज्यामुळे पुढील 24 तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे. कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, पूर्व आणि पश्चिम बर्धमान, हावडा, झारग्राम, बांकुरा आणि पुरुलिया जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

दक्षिण 24 परगणा-पूर्व मिदनापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची शक्यता

आयएमडीने सांगितले आहे की, बुधवारी पश्चिम बर्धमान, झारग्राम, बांकुरा आणि पुरुलिया जिल्ह्यात बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवरून गुलाब चक्रीवादळ गेल्यामुळे मंगळवारी सकाळी दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. खराब हवामानामुळे समुद्रातील परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राला उद्यापासून रेड अलर्ट

'गुलाब' चक्रीवादळ (Gulab Cyclone) काल संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण उडीशामधील कलिंगपट्टणम ते गोपाळपूरमध्ये धडकल्यानंतर त्याचा वेग कमी झाला आहे. या चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले असून, हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस धुवांधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील 7 जिल्ह्यांना उद्यापासून दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यातआला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. येथे 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रात देखील वाऱ्यांचा वेगअधिक असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT