Cyclone
Cyclone  Dainik Gomantak
देश

Cyclone Biparjoy: भारतात लवकरच धडकणार बिपरजॉय; गुजरातमध्ये ऑरेंज अलर्ट, NDRF तैनात

Puja Bonkile

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर पोहोचण्यास अद्याप दोन दिवसांचा अवधी आहे, परंतु या चक्रीवादळाने आधीच त्याचे भयंकर रूप दर्शवत आहे. 

मुंबईपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत समुद्रात वादळी लाटा उसळत आहेत. वादळाचा सर्वाधिक प्रभाव गुजरातमध्ये अपेक्षित आहे, जेथे भारतीय हवामान खात्याने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

भारतात लवकरच धडकणार 'बिपरजॉय'

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 13 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता वर ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर केंद्रीत झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ पार करण्याची शक्यता आहे. आयएमडीने कच्छपासून मुंबईपर्यंत अलर्ट जाहीर केला आहे. आयएमडीने असे ट्विट करत ही माहिती दिली आहे.

  • मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई

गुजरातच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टी भागात मासेमारीवर (Fishing) बंदी घालण्यात आली आहे. या जिल्ह्यांतील लोकांना समुद्रातून बाहेर काढले जात आहे. पीटीआयने पंतप्रधान कार्यालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्रीय गृह मंत्रालय चक्रीवादळ बिपरजॉयच्या परिस्थितीचा सतत आढावा घेत आहे. एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात आहेत, तर आणखी 15 टीम तयार आहेत.

  • बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पाऊस 

IMD नुसार गुजरातच्या कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर या किनारी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि बुधवार आणि गुरुवारी पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे.

वादळाच्या इशाऱ्यानंतर गुजरातमधील अनेक बंदरे बंद करण्यात आली असून त्यात देशातील सर्वात मोठे सार्वजनिक क्षेत्रातील बंदर असलेल्या कांडलाचाही समावेश आहे. कांडला बंदरातून 15 जहाजे रवाना झाली आहेत. ओखा, पोरबंदर, सलाय, बेडी, नवलखी, मांडवी आणि जखाऊ बंदरेही बंद करण्यात आली आहेत.

  • पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

चक्रीवादळाचे तीव्र रुप लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पृथ्वी विज्ञान सचिव एम रविचंद्रन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य कमल किशोर आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबीला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत ताशी 125 ते 135 किलोमीटर वेगाने वादळ वाहू शकते आणि वाऱ्याचा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Top News: मोदींना लोकोत्सवाचे निमंत्रण, आसगाव घर मोडतोड प्रकरण; राज्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT