Crocodiles Viral Video Dainik Gomantak
देश

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Man With Crocodile On Bike: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण एका मोठ्या मगरीला बाईकवर घेऊन जाताना दिसत आहे.

Sameer Amunekar

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही अवाक होईल. या व्हिडिओमध्ये दिसतं की दोन तरुण बाईकवरून जात आहेत, आणि त्यापैकी मागे बसलेला तरुण आपल्या हातात एक महाकाय मगर धरून आहे. हा दृश्य पाहून प्रथमदर्शनी वाटतं की एखाद्या चित्रपटातील धाडसी प्रसंग पाहतोय. व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले.

व्हिडिओमध्ये दोघंही तरुण त्या मगरला घेऊन आरामात गाडीवरून जात आहेत, जणू काही ही मगर त्यांच्या घरचा पाळीव प्राणी आहे. यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सने यावर प्रतिक्रिया देताना आश्चर्य व्यक्त केलं. काहींनी लिहिलं, “रेस्क्यू टीमलाही एवढं धाडस नसतं!”, तर काहींनी याला अतिशय धोकादायक प्रकार असं म्हटलं आहे.

या व्हिडिओच्या मागचं खरं सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा अनेकांना धक्का बसला. हा व्हिडिओ खरा नसून एआय (Artificial Intelligence) च्या मदतीने तयार केलेला आहे.

व्हिडिओचे फ्रेम्स बारकाईने पाहिल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या मगर हलताना तिच्या हालचालींमध्ये सुसंगतता नव्हती, तर काही भागांमध्ये 'डीपफेक'सदृश परिणाम जाणवत होते.

अनेक डिजिटल तज्ज्ञांनी यावर भाष्य करत स्पष्ट केलं की हा व्हिडिओ एक बनावट क्लिप आहे जी सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधण्यासाठी बनवण्यात आला आहे.

इंटरनेटवर आणि विशेषतः सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या व्हिडिओजविषयी सावध राहणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि डीपफेक टेक्नॉलॉजीमुळे अशा बनावट क्लिप्स तयार करणं आता सहज शक्य झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT