Crocodile Fight Elephant Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: पाणी पिणाऱ्या गजराजावर मगरीचा जोरदार हल्ला, पाहून तुम्हीही हादराल; मृत्यूची लढाई कोणी जिंकली?

Viral Video: पाणी पिणाऱ्या हत्तीची शिकार करण्याचा मगरीने प्रयत्न केला. पण हत्तीने अवघ्या काही सेंकदात मगरीच्या जबड्यातून आपली सोंड सोडवली.

Manish Jadhav

Crocodile Fight Elephant Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या मगरीने हत्तीवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. पाणी पिणाऱ्या हत्तीची शिकार करण्याचा मगरीने प्रयत्न केला. पण हत्तीने अवघ्या काही सेंकदात मगरीच्या जबड्यातून आपली सोंड सोडवली.

आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा

मगरीचा हत्तीवर हल्ला

खरं तर, जंगलात टिकून राहणे सोपे काम नाही, कारण हल्ला कधी आणि कुठून होईल हे सांगणे अशक्य आहे. पाणी पितानाही काळजी घेतली पाहिजे, कारण शिकारीही पाण्यात बसतात. त्याचप्रमाणे हत्ती आणि मगरीमधील लढाईचा व्हिडिओ समोर आला आहे. झालं असं की, हत्तींचा एक कळप नदीकाठी पाणी पीत होता. याचदरम्यान, मगरीने हत्तीवर हल्ला केला. मगरीने हत्तीची सोंड पकडून खाली खेचली. या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आफ्रिकन देश झांबियामधून एका हत्तीणी आणि मगरीच्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, एक हत्तीणी तिच्या बाळाला मगरीच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. हत्ती आणि मगरीचा हा संघर्ष एका पर्यटकाने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला.

मगरीनं हत्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मगर हत्तीच्या बाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून मादी हत्तीणीने मगरीवर हल्ला केला आणि दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. हल्ल्यानंतर, हत्तीने पाण्यात मगरीला मारण्यास सुरुवात केली. या मादी हत्तीणीने तिच्या सोंडेने मगरीला मारले. दरम्यान, मगरीने हत्तीच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण ती हत्तीच्या तावडीतून सुटू शकली नाही. काही वेळाने हत्ती मगरीला पाण्याच्या काठावर घेऊन आला आणि मग मगर शांत झाली. यामुळे तिचा मृत्यू झाला असावा किंवा तिला गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर Anytimemothernature नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर यूजर्स आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT