Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra in Delhi | Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Delhi updates Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: 'हिंदू- मुस्लीम वाद फक्त...', मोदींवर टीकास्त्र

Rahul Gandhi: देशाचे सामान्य नागरिक एकमेकांवर प्रेम करतात. हिंदू, मुस्लिम, शीख , ख्रिश्चन अशा सगळ्या धर्माचे लोक एकमेकांसोबत प्रेमाने राहतात. मी कन्याकुमारीपासून ते दिल्लीपर्यत प्रवास केला आहे.

दैनिक गोमन्तक

Bharat Jodo Yatra in Delhi : बऱ्याच दिवसापासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मोठ्या उत्साहात सुरु होती.आता ही यात्रा दिल्लीत पोहोचली आहे. दिल्लीत राहुल गांधींचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले. भारत जोडो यात्रा हरियाणाच्या बदरपूर बॉर्डरवरुन दिल्लीत दाखल झाली.

आता ही यात्रा निजामुद्दीन, आईटीओ चौक, राजघाट मार्गानं लाल किल्ल्यावर पोहोचली आहे. लाल किल्ल्यावर राहुल गांधीचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे , कमल हसनसुद्धा उपस्थित आहेत. देशाचे सामान्य नागरिक एकमेकांवर प्रेम करतात. हिंदू, मुस्लिम, शीख , ख्रिश्चन अशा सगळ्या धर्माचे लोक एकमेकांसोबत प्रेमाने राहतात. मी कन्याकुमारीपासून ते दिल्लीपर्यत प्रवास केला आहे. मी 2800 किलोमीटरची यात्रा केली आहे, मला कुठेही तिरस्कार दिसला नाही. सर्वजण एकमेकांचा आदर करतात. दरम्यान, भाषणात राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार अंबानी -अदानीचे सरकार आहे. एक-दोन बॅंकाना पैसे दिले जातात. परंतु शेतकरी, छोटे-छोटे उद्योजक रोजगार आणू शकतात. भाजप ( BJP) पक्ष फक्त हिंदू धर्मावर बोलतो, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी वेगवेगळ्या राज्यात पायी प्रवास करत जनतेबरोबर संवाद साधला होता. त्याचबरोबर,भारत जोडो यात्रेचे उद्दिष्ट्य देशाला जोडण्याचे आहे.असेही राहुल गांधीं ( Rahul Gandhi )नी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

SCROLL FOR NEXT