Cristiano Ronaldo Dainik Gomantak
देश

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Cristiano Ronaldo Goa: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या २२ ऑक्टोबर रोजी गोव्यात खेळण्याबाबतचा अंतिम निर्णय सुरक्षा यंत्रणा घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

Sameer Panditrao

पणजी: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या २२ ऑक्टोबर रोजी गोव्यात खेळण्याबाबतचा अंतिम निर्णय सुरक्षा यंत्रणा घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. याकामी राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती आणि रोनाल्डोच्या खासगी सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल निर्णायक ठरेल, असे संबंधित सूत्रास वाटते.

एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात रोनाल्डोचा सौदी अरेबियातील अल नासर क्लब व एफसी गोवा संघ एकमेकांविरुद्ध होम अँड अवे पद्धतीने खेळणार आहे. गतमोसमात ४० वर्षीय स्ट्रायकर तंदुरुस्तीच्या कारणास्तवही काही सामन्यांना मुकला होता.

प्राप्त माहितीनुसार, जगप्रसिद्ध खेळाडू असल्यामुळे वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थेने हिरवा कंदिल दाखविला तरच रोनाल्डो बाहेरगावचा सामना खेळतो.

एफसी गोवा आणि अल नासर क्लब एकाच गटात असल्यामुळे रोनाल्डो गोव्यातील सामन्यात खेळण्याबाबत देशभरातील फुटबॉलप्रेमी उत्साहित आहेत. तो गोव्यात खेळण्यास राजी झाल्यास प्रशासनाला खूपच मोठा चोख बंदोबस्त ठेवावा लागेल.

कमी आसनक्षमतेच्या फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये प्रवेश करताना किंवा रोनाल्डोला पाहण्याच्या उद्देशाने स्टेडियमबाहेर मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षा विषयक खूपच कडक उपाययोजना करणे गरजेचे असेल, असे राज्य प्रशासकीय सुरक्षा विषयक माहिती असलेल्या सूत्राने सांगितले.

ख्रिस्तियानो रोनाल्डो व अल नासर यांच्यातील करारानुसार, अवे सामन्यांत खेळायचे की नाही हे ठरविण्याची मुभा पोर्तुगीज फुटबॉलपटूस आहे. तो २०२३ साली अल नासर संघात दाखल झाला होता, यावर्षी जून महिन्यात करार २०२७ पर्यंत वाढविण्यात आला.

खूपच कमी अवे सामने

गतमोसमात (२०२४-२५) अल नासर क्लब एएफसी चँपियन्स लीग एलिट स्पर्धेत खेळला होता. रोनाल्डो या संघाचा कर्णधार असला, तरी गतमोसमात तो जास्त अवे सामने खेळला नव्हता. माहितीनुसार तो इराक, इराण, कतार या देशात सामने खेळण्यास गेला नव्हता. अवे लढतीत न खेळण्याबाबत दुखापती, तसेच इतर कारणे देण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने उपउपांत्यपूर्व फेरीतील अवे सामनाही टाळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT