crime news delhi cash not withdrawn thieves entire atm cash filled machine  Dainik Gomantak
देश

चोरट्यांनी एटीएम केलं लंपास, मशीनमध्ये होते 30 लाख

पोलीस परिसरात नीट गस्त घालत नसल्याचा नागरिकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

दक्षिण पूर्व दिल्लीतील अली विहारमध्ये चोरीची घटना समोर आली असून, चोरट्यांनी एटीएममध्ये (ATM) घुसून संपूर्ण मशीन उखडून टाकले. मशिनमध्ये जवळपास 30 लाख रुपयांची रोकड असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांची गस्तही नीट होत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जैतपूरच्या अली विहार भागात काल रात्री चोरट्यांनी स्टेट बँकेच्या (bank) एटीएममध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी येथून संपूर्ण मशीन पळवून नेले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

चोरट्यांनी संपूर्ण मशीन पळवून नेल्याची घटना आमच्या परिसरात पहिल्यांदाच घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिक रहिवासी म्हणाले की, गुन्हेगारांवर दिल्ली पोलिसांची भीती नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.

पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत

या परिसरात दररोज चोरीच्या घटना घडत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलीस (police) परिसरात नीट गस्त घालत नसल्याचा मोठा आरोप लोकांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे. त्यामुळे चोरी, दरोडे, स्नॅचिंग अशा घटना घडत आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. एटीएममध्ये जवळपास 30 लाख रुपये रोख असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT