Fact Check Covid bodies thrown into the Ganges 
देश

गंगेत फेकले जातायेत कोव्हिड मृतदेह?

गोमंतक वृत्तसेवा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह पाटणा (Patna) येथे गंगा नदीमध्ये (Ganga) टाकण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी आहे. बिहारमध्ये (Bihar) दोन इंजिनवर चालणाऱ्या जेडीयू आणि भाजप सरकारमध्ये यावर प्राइम टाइममध्ये चर्चा होत नाही. अशा कॅप्शनसहीत हे फोटो व्हायरल होते. (Covid bodies being thrown into the Ganga )

बिहार कॉंग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा (Madan Mohan Jha) यांनी हे फोटो सोशल मिडियावरुन शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मिडियावर शेअर झाल्यानंतर लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. इंडिया टुडेच्या अ‍ॅंटी फेक न्यूज रुमने यासंदर्भातील सत्यता तपासली असता ही माहिती अर्धवट असल्याचे समोर आले आहे. व्हायरलं झालेल्या फोटोमध्ये मृतदेह गंगेमध्ये टाकण्यात येत आहेत, मात्र ते कोरोना रुग्ण आहेत किंवा नाही हे अद्याप कळू शकलेलं नाही.

‘’पाटणा मेडिकल महाविद्यालयामधाील हॉस्पिटलच्या (Patna Medical College) कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काली घाटाजवळील गंगा नदीत बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे,’’ असं 8 जुलै रोजी प्रकाशित झालेल्या हिंदुस्तान टाइम्सच्या पटणा आवृत्तीत फोटोखाली छापण्यात आलं होतं. पीएमसीएचमध्ये अज्ञात मृतदेहांची गंगेमध्ये अशाप्रकारे विल्हेवाट लावण्याची पध्दत अगदी सामान्य असल्याची सांगण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्य़ासाठी रुग्णांचे मृतदेह टाकण्यात आल्याचा दावा पूर्णपणे सत्य नाही. नदीत टाकण्यात आलेला मृतदेहाचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसल्याचे समोर  आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT