CoronaVirus Dainik Gomantak
देश

देशात CoronaVirus च्या आर व्हॅल्यू दरात वाढ

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागू असताना दुसरीकडे सलग पाचव्या दिवशी देशभरात कोरोनाचे 40 हजार नवे रुग्ण आढळून आले आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागू असताना दुसरीकडे सलग पाचव्या दिवशी देशभरात कोरोनाचे 40 हजार नवे रुग्ण आढळून आले आहे. यातच आता नवी दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी चिंतेत भर टाकणारी माहिती दिली आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रजनन दर हा वाढत आहे, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे (Dr. Shekhar Mande) यांनीही, कोरोनाची तिसरी लाट देशात येणार असल्याचे म्हटले आहे परंतु कशी आणि केव्हा येईल हे सांगणे मात्र अवघड आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले, आधी कोरोना व्हायरसची आर व्हॅल्यू 0.99 एवढी होती. आता ती वाढून एक एवढी झाली आहे. विषाणूच्या प्रनन दरामधील वाढ पाहता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. आर व्हॅल्यू म्हणजे व्यक्तीपासून कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशामधील ज्या भागामध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा दर हा अधिक , त्या भागामध्ये कठोर निर्बध लावण आवश्यक आहे. डॉ. मांडे पुढे म्हणाले, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरुध्द कोरोनाची लस काम करत असल्याचे देखील त्यांनी संशोधनामधून मांडले आहे. यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की, त्यांनी तात्काळ कोरोनाची लस घ्यावी. हाच जीवघेण्या विषाणूपासून बचावाचा योग्य मार्ग आहे.

डॉ. मांडे पुढे म्हणाले, भारताने कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा सामना केला आहे. त्यामुळे डेल्टा प्लस या व्हेरिएंटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. युरोप आणि अमेरिकेने कोरोनाची लाट पाहिली आहे. दरम्यान आपल्याला या कोरोनाच्या लाटेपासून सतर्क रहावे लागणार आहे. केरळमध्ये कोरोना माहामारीचा वेग तीव्र होत आहे. देशामध्ये एकूण कोरोनाबाधितांपैकी साधारणत:हा एकट्या केरळ राज्यामध्ये अर्धे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाच्या संक्रमणांच्या वाढीचा दर लक्षात घेता, केरळनंतर विषाणूचा महाराष्ट्रात येतो आणि नंतर देशाच्या इतर भागामध्ये थौमान घालण्यास सुरुवात झाली आहे.

समजून घ्या आर-व्हॅल्यू

डॉ. गुलेरिया म्हणाले, गोवर आणि चिकनपॉक्सची या रोगांची आर व्हॅल्यू 8 अथवा त्यापेक्षा जास्त होती. याचाच अर्थ एक कोरोना संक्रमित व्यक्ती साधाराणत:हा आठ किंवा अधिक व्यक्तींना संक्रमित करु शकतो. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्ये आपण अनुभवले की, एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब संक्रमित होत होते. तसेच डेल्टा च्या व्हेरिएंटमुळे (Delta Variant) संपूर्ण कुटुंब कोरोना विळख्यात सापडल्याचे पाहायला मिळाले, असेही यावेळी गुलेरिया यांनी म्हटले.

हॉटस्पॉटवर लक्ष

डॉ.गुलेरिया यांनी पुढे म्हटले, कोरोना संक्रमणाचा ज्या भागामध्ये अधिक संक्रमण झाले त्या भागामध्ये ट्रिपल-टी अर्थात टेस्ट, ट्रॅक, आणि ट्रिटमेंट या रणणितीच्या आधार काम करावे लागणाऱ आहे. यामुळे कोरोना फैलावाला रोख लावण्यात आला पाहिजे. कोरोना संक्रमणाचा ग्राफ याच पध्दतीने वाढत राहिल्यास येणाऱ्या काळामध्ये गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशामध्ये एकूण 46 जिल्ह्यांत कोरोना संक्रमण दर हा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर दुसरीकडे 54 जिल्ह्यांत हाच दर 5 ते 10 टक्क्यांच्या आसपास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT