Coronavirus Dainik Gomantak
देश

Covid 19: केंद्र सरकारने Corona Hotspot ठरणारी 10 राज्य केली जाहीर

देशातील 10 राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढू लागली असल्याचे निरिक्षण तज्ञांकडून नोंदविण्यातन आले आहे.

दैनिक गोमन्तक

देशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनाबाधितांच्या रुग्णवाढीचा वेगही वाढला आहे. देशातील 10 राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढू लागली असल्याचे निरिक्षण तज्ञांकडून नोंदविण्यातन आले आहे. मागील काही आठवड्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीचा दर (Positivity Rate) असणाऱ्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. देशामधील किमान 46 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी दर तब्बल 10 टक्क्यांपेक्षा जास्त असून 53 जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 5 ते 10 टक्क्यांच्या जवळपास आहे. या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) कोरोना बाधितांचं निदान तात्काळ होण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

सध्यस्थितीत पुन्हा एकदा हालगर्जीपणा केल्यास देशातील या जिल्ह्यांमध्ये आणखी परिस्थीती ढासळत जाईल, असा इशाराही केंद्रीय मंत्रायलयाकडून (Central Ministries) देण्यात आला आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्रप्रदेश आणि मणिपूर या राज्यांतील परिस्थितीचा कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. वरील राज्यांमधील आरोग्य विभागाकडून कोरोनाचं सर्वेक्षण आणि आणि व्यवस्थापनासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचाही आढावा या बैठकित घेण्यात आला. दैनंदिन रुग्णसंख्या या राज्यांमध्ये वाढत आहे.

या पाश्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीवर, देशांतर्गत प्रवासावर रोख लावण्यात यावी जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल, असं आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT