Viral Video 
देश

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Bike Stunt Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यतल्या-छोटी गोष्ट काही क्षणार्धात व्हायरल होते. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट होतात

Manish Jadhav

Bike Stunt Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यतल्या-छोटी गोष्ट काही क्षणार्धात व्हायरल होते. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट होतात, पण त्यापैकी काहीच हटके किंवा लक्षवेधी व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एका जोडप्याला (Couple) रील बनवण्याची स्टाईल चांगलीच महागात पडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपे 'स्टाईलिश' पद्धतीने रील बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय पाहिले?

व्हिडिओच्या सुरुवातीला एक तरुणी एका विशिष्ट ठिकाणी हेल्मेट (Helmet) घालून उभी आहे. दुसरा व्यक्ती बाईक चालवत तिच्या दिशेने येतो, त्याचा उद्देश तिच्या अगदी जवळ येऊन पुढचे चाक वर करुन अचानक ब्रेक मारण्याचा होता. हा स्टंट त्यांचा प्लॅन होता, पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळेच घडले. बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने योग्य वेळी ब्रेक न लावल्यामुळे बाईक तरुणीच्या अगदी जवळ थांबली नाही. बाईकचा वेग जास्त असल्याने पठ्ठ्याचे नियंत्रण सुटले. या धडकेत तरुणी जागीच खाली पडली आणि बाईक स्वार तरुणही बाईकसह जोरात कोसळला.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. "लो भाई बन गई रील'', असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 13 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

  • एका युजरने लिहिले, "लो भाई हो गया कांड"

  • दुसऱ्याने "रील टू हेवन" अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

  • काही यूजर्संनी त्यांना "खतरों के खिलाडी" तर "ठोक दिया" असेही म्हटले.

  • एका युजरने, "बेवकूफ आहेत हे लोक, बेसिक फिजिक्सही (Basic Physics) माहीत नाही," असे ताशेरे ओढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2 may 2026: पगारवाढ ते नवं घर! शनिदेवाच्या कृपेनं 'या' राशींची होणार भरभराट; लव्ह लाईफमध्येही येणार नवा गोडवा

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Goa Karnataka Island Dispute: गोव्याने आपली हक्काची बेटे कशी गमावली?

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

SCROLL FOR NEXT