Couple Viral Video Dainik Gomantak
देश

Couple Viral Video: चालत्या बाईकच्या टँकवर बसून बॉयफ्रेंडला मिठी मारली अन्....जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी ठोठावला 53 हजारांचा दंड

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे रस्त्यांवरील अश्लीलता आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Sameer Amunekar

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि तितकाच चर्चेत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी सार्वजनिक रस्त्यावर आपल्या बॉयफ्रेंडसोबत अतिशय धोकादायक पद्धतीने रोमान्स करताना दिसते. ही दृश्यं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे, तर काहींनी त्यांच्या या वागण्यावर टीकाही केली आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, एक तरुण रस्त्यावर भरधाव वेगाने बाईक चालवत आहे आणि त्याच्या समोर बाईक टँकवर एक तरुणी बसलेली आहे. विशेष म्हणजे, ती तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला घट्ट मिठी मारत आहे आणि दोघंही रस्त्यावरुन बिनधास्तपणे प्रवास करत आहेत.

हे दृश्य उत्तर प्रदेशातील नोएडा येथील यमुना एक्सप्रेसवेवरील सेक्टर ९४ परिसरातील असल्याचे समोर आले आहे. ही दृश्यं पाहून सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

हा प्रकार केवळ सार्वजनिक शिस्तभंग नव्हे तर इतर वाहनचालकांच्याही सुरक्षेला धोका ठरू शकतो. त्यामुळे या प्रकारावर कठोर कारवाई होण्याची मागणीही नेटकऱ्यांकडून होत आहे.

काही अहवालांनुसार, वाहतूक पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत संबंधित वाहन चालकावर कारवाई करत ५३,५०० रुपयांचे चलनही फाडले आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर, सोशल मीडिया वापरकर्त्यांनाही या जोडप्याच्या कृतीवर संताप व्यक्त केला. लोकांनी त्यांच्या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यांना "अज्ञानी" म्हटले.

व्हिडिओवर नाराजी व्यक्त करताना एका वापरकर्त्याने लिहिले की, "हवामान आल्हाददायक आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की रस्ते खाजगी बेडरूम बनवावेत.

डिस्क्लेमर: या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. दैनिक गोमंतक कोणत्याही प्रकारच्या दाव्याची पुष्टी करत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT