Vaccination Dainik Gomantak
देश

Bharat Biotech च्या Nasal Vaccine ला आपत्कालीन वापरासाठी DCGI ने दिली मंजूरी

Vaccination: भारत बायोटेकच्या नेझल वॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी DCGI कडून मंजूरी मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

Bharat Biotech: भारत बायोटेकच्या नेझल वॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी DCGI कडून मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. ही भारतातील पहिली नेझल वॅक्सिन असेल. त्यामुळे भारतातील कोरोनाविरुद्धच्या युद्धाला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भारताने आतापर्यंत 100 कोटी कोविड लसीकरण करुन विक्रम केला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, 'कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारताने मोठी झेप घेतली आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीला DCGI ची मान्यता मिळाली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, 'यानंतर ही वॅक्सिन आणीबाणीच्या परिस्थितीत भारतात 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना दिली जाऊ शकते.'

महामारीविरुद्धचा लढा अधिक तीव्र होईल

आरोग्यमंत्र्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले की, 'नेझल वॅक्सिन आल्यानंतर भारत कोरोना (Corona) महामारीचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करु शकेल.' डॉ. मांडविया पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने (India) कोरोनाविरुध्दच्या लढ्यात विज्ञान, संशोधन आणि त्यातील संसाधनांचा चांगला वापर केला. या वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि सर्वांच्या प्रयत्नाने भारत कोरोनाला पूर्णपणे पराभूत करु शकेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT