राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 500 रुपयांत LPG गॅस सिलेंडर देणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी सोमवारी केली आहे. राजस्थान सरकार दारिद्र्य रेषेखालील आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना वर्षभरात 12 सिलेंडर मिळणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच नागरिकांना 'रसोई किट'मध्ये स्वयंपाकघरातील सामानही देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा गेहलोत यांनी केली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी घोषणा करत सांगितले आहे की, ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येईल. राजस्थानच्या जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर करण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी सरकार नवीन योजना सुरु करणार आहे. या नव्या योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. या योजनेअंतर्गत वर्षाला 12 सिलेंडर दिले जातील. सरकारचं लक्ष्य गरीब आणि गरजू लोकांना योजनांमध्ये पूर्णपणे सामावून घेऊन त्यांना अधिक लाभ देणे हा आहे.
अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेमध्ये जनसंबोधन करताना सांगितले की, 'सध्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु आहे. मी यावेळी जाहीर करतो की दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेशी संबंधित लोकांना आहेत. 1 एप्रिलनंतर 500 रुपये किमतीत गॅस सिलेंडर दिले जातील. गरीबांना वर्षभरात 12 सिलेंडर 500 रुपयांमध्ये मिळतील, या सिलेंडर सध्या 1040 रुपयांन उपलब्ध आहेत.'
अशोक गेहलोत यांनी ट्वीट (Tweet) करत म्हटले आहे की, 'राज्य सरकार गरिबांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी सातत्याने लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. यासाठी राज्य सरकार गरिबांना स्वस्त दरात सिलेंडर देण्याची योजना आणणार आहे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.