Gulshan Kumar Murder Case Bombay HC  Dainik Gomantak
देश

Gulshan Kumar Murder Case: अब्दुल रौफची याचिका न्यायालयानं फेटाळली

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार हत्येप्रकरणी (Gulshan Kumar Murder Case) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HC) आज आपला निर्णय दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार हत्येप्रकरणी (Gulshan Kumar Murder Case) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HC) आज आपला निर्णय दिला आहे. गुलशन कुमारची 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईच्या जुहू भागात हत्या करण्यात आली होती. तब्बल 24 वर्षानंतर न्यायालयाने या प्रकरणात आपला निर्णय दिला आहे. (Conviction of Rauf Merchant is upheld by Bombay High Court in Gulshan Kumar murder case)

गुलशन कुमार हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जाधव आणि बोरकर यांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय सुनावला आहे. गुलशन कुमार हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने एकूण चार अपील उच्च न्यायालयात नोंदवले आहे. अब्दुल रौफला दोषी ठरवले आहे. तर रमेश तोरानी यांच्या निर्दोष सुटण्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने आणखी एक अपील दाखल केली आहे.https://twitter.com/ANI/status/1410473726672457728

यापूर्वी सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेला आणखी एक आरोपी अब्दुल रशीद याला मुंबई हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. अब्दुल रशीद आणि दाऊद मर्चंट यांना हायकोर्टाने दोषी ठरविल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

12 ऑगस्ट 1997 रोजी गुलशन कुमार मंदिरातून घरी परतत असताना काही अतिरेकी लोकांनी गुलशन कुमारवर गोळ्या झाडल्या. गुलशन यांचा मृत्यू सर्वांनाच धक्कादायक होता. कोणीही असा विचार केला नव्हता की कोणी एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची उघडपणे हत्या करेल. खरं तर, गायक नदीमच्या सांगण्यावरून गुलशन कुमारची हत्या करण्यात आली. इंडस्ट्रीत नाव गमावल्याबद्दल नदीमचा राग अनावर झाला आणि त्याने गुलशन कुमारला ठार मारण्याचा विचार केला. अबू सलेमचा गुलशन कुमार खून प्रकरणात थेट सहभाग असूनही आजपर्यंत त्याच्यावर खुनाचा खटला चालला जाऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT