Malala Yousafzai Dainik Gomantak
देश

Malala Yousafzai: झारखंडमधील सरकारी शाळेत मलालाच्या पोस्टरवरुन गोंधळ, स्थानिकांनी केला तीव्र विरोध

Jharkhand: झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील कुजू येथे असलेले पब्लिक हायस्कूल सध्या वादाचे केंद्र बनले आहे.

Manish Jadhav

Malala Yousafzai Jharkhand Controversy: झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील कुजू येथे असलेले पब्लिक हायस्कूल सध्या वादाचे केंद्र बनले आहे.

पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाईचे पोस्टर एका सरकारी शाळेत लावण्यात आले आहे.

ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी याला तीव्र विरोध केला. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणाले की, आपल्या देशात महापुरुषांची कमी आहे का?

तसेच, ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाचे स्वातंत्र्यसैनिक. आपल्या देशाचे राष्ट्रपती. आपल्या देशातील अनेकांना नोबेल पारितोषिकही मिळाले आहे.

शाळेच्या भिंतीवर पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसुफझाईचा (Malala Yousafzai) मोठा फोटो लावून शाळा कोणता संदेश देऊ इच्छिते?

दरम्यान, पब्लिक हायस्कूलच्या शिक्षकांना (Teachers) आपल्या देशातील महापुरुष माहित नाहीत का? मलाला युसुफझाईचे पोस्टर लावून ते मुलांना तिचा आदर्श का देत आहेत? मलाला युसुफझाईबद्दल बऱ्याच गोष्टी मुलांना शिकवण्यात आल्या.

तिच्या संघर्षाबद्दलही सांगण्यात आले. आपल्या देशात अशा महान व्यक्तिमत्त्वांची कमतरता आहे का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

युसुफझाईचा फोटो का लावला?

मलाला युसूफझाईचे पोस्टर पब्लिक हायस्कूलच्या भिंतीवर लावणाऱ्या शिक्षिका मनीषा धवन यांचा स्थानिक लोकप्रतिनिधी जय कुमार ओझा यांनी निषेध केला.

ओझा म्हणाले की, 'तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना पाकिस्तानातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या संघर्षाबद्दल का सांगत आहात.

आदर्श मानता येईल असा एकही स्वातंत्र्यसैनिक आपल्या देशात नाही का? पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसूफझाईचा फोटो शाळेत का लावला?'

हेतुपुरस्सर पोस्टर

झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातील कुजू येथील पब्लिक हायस्कूलच्या भिंतीवर पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसूफझाईचे पोस्टर लावण्यात आल्यानंतर संपूर्ण परिसरातून तीव्र विरोध होत आहे.

हे पोस्टर लावणाऱ्या शिक्षिका मनीषा धवन यांना स्थानिक लोक दोष देत आहेत. एका षड्यंत्राखाली आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसैनिकाचे चरित्र शिकवण्याऐवजी शाळेच्या भिंतींवर हेतुपुरस्सर पाकिस्तानी समाजकंटकांचे फोटो लावून मुलांना प्रेरित केले जात आहे.

त्यांच्या कार्याचा जयजयकार करुन मुलांना त्यांचा आदर्श असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, 12 जुलै 1997 रोजी पाकिस्तानातील स्वात जिल्ह्यातील मिंगोरा शहरात जन्मलेल्या मलाला युसुफझाईला मुलांच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी 2014 मध्ये संयुक्तपणे नोबेल पुरस्कार (शांतता) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT