Controversial statement of poet Munawwar Rana
Controversial statement of poet Munawwar Rana Dainik Gomantak
देश

तालिबानपेक्षा जास्त 'कृरता' भारतात; कवी मूनव्वर राणांचे वादग्रस्त वक्तव्य

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता असलेल्या केंद्र सरकारच्या कामांविरोधात सातत्याने वक्तव्य करणारे कवी मूनव्वर राणा (Munawwar Rana) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सत्ता काबीज केलेल्या तालिबानबद्दल (Taliban) बोलताना राणा यांनी या विषयावर एक वादग्रस्त विधान केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी जे करत आहेत त्यापेक्षा जास्त क्रूरता भारतात आहे, आम्ही दंगली आयोजित करण्यात जागतिक नेते आहोत असे विधान मुनव्वर राणा यांनी यावेळी केले आहे.

उत्तर प्रदेशात तबिलानचे समर्थन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे बोलले जाते आहे, कारण समाजवादी पक्षाचे खासदार डॉ शफीकुर रहमान बुरके, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते आणि माजी मंत्री मौसाना मसूद मदानी यांच्यानंतर आता प्रसिद्ध कवी मूनव्वर राणा यांनीही तालिबानी दहशतवाद्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.

कवी मुनावर राणा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संभलचे खासदार डॉ शफीकुर रहमान यांचीही पाठराखण केली. डॉ.बर्क यांनी तालिबानच्या बाजूने केलेल्या विधानाचे समर्थन करताना. कवी राणा म्हणाले की, ‘तालिबानी वाईट लोक नाहीत. परिस्थितीमुळे ते तसे झाले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.’

संभल समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बुरके यांच्यानंतर आता प्रसिद्ध कवी मूनव्वर राणा देखील तालिबानच्या समर्थनार्थ करताना दिसले आहेत. राणा म्हणाले की, तालिबान्यांनी सत्तेवर कब्जा करून काहीही चुकीचे केले नाही, असा त्यांचा विश्वास आहे. अफगाणिस्तानवर ताबा घेऊन तालिबान्यांनी खरं तर अफगाणिस्तानला मुक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

Goa Crime News: नागाळीत चोरट्यांचा 'सुळसुळाट', दोनापावलातूनही सोन्याचे दागिने लंपास; पोलिसांच्या दुर्लक्षाचा होतोय आरोप

Goa Crime News: पत्‍नीच्‍या खूनप्रकरणी दोषी पतीला कोर्टाने सुनावली जन्‍मठेपेची शिक्षा; 50 हजारांचा दंडही ठोठावला

Laxmikant Parsekar: पार्सेकरांची झाकली मूठ कायम, गूढ वाढले! तानावडे पुन्हा घेणार भेट; पाऊणतासाची बैठक निर्णयाविना

Tivim Crime: पैशांच्या वसुलीसाठी अभियंत्याचे अपहरण; कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT