Congress targets BJP Dainik Gomantak
देश

'द कश्मीर फाइल्स' वरुन काँग्रेसचा भाजपवर निशाणा

काँग्रेसने दावा केला आहे की यूपीए सरकारने जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी 5242 घरे बांधली आहेत.

दैनिक गोमन्तक

सध्या बॉलिवूड चित्रपट 'द कश्मीर फाइल्स'ची (The Kashmir Files) बरीच चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचा विषय काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा आहे. अनेक राज्यांनी आपापल्या परीने हा चित्रपट करमुक्त केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केरळ काँग्रेसने जम्मू-काश्मीरमधून काश्मिरी पंडितांच्या पलायनाबद्दल अनेक ट्विट केले जात आहेत, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. काश्मिरी पंडित प्रकरणाबाबत केरळ काँग्रेसने जाहीर केलेल्या तथ्यांबद्दल लोक सोशल मीडियावरती खूप चर्चा करत आहेत. काँग्रेसनेही यावेळी आपल्या सरकारचे कौतुक केले आहे. (Congress targets BJP over 'The Kashmir Files')

काँग्रेसने दावा केला आहे की यूपीए सरकारने जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी 5242 घरे बांधली आहेत. याशिवाय पंडितांच्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, यामध्ये पंडितांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 1168 कोटींची शिष्यवृत्ती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. त्यावेळी सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षावर (BJP) हल्ला करताना केरळ काँग्रेसने (Congress) म्हटले की, काश्मिरी पंडितांनी मोठ्या प्रमाणावरती खोरे सोडले.

'भाजपने काश्मीर पंडितांसाठी काहीच केले नाही'

केरळ काँग्रेसने पुढे म्हटले की, त्यावेळी राज्यपाल जगमोहन होते जे आरएसएस पक्षाचे होते. भाजप समर्थित व्हीपी सिंग सरकारच्या काळात पलायन सुरू झाले होते असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, 'भाजप समर्थित व्हीपी सिंग सरकार डिसेंबर 1989 मध्ये सत्तेवर आले. महिन्यात जानेवारी 1990 मध्ये पंडितांचे पलायन सुरू झाले. भाजपने काहीही केले नाही आणि नोव्हेंबर 1990 पर्यंत व्हीपी सिंग यांना पाठिंबा दिला. काँग्रेस (Congress) पक्षाच्या युनिटने दावा केला आहे की पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी राज्यपाल जगमोहन यांनी त्यांना जम्मूमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'भाजप पलायन करताना अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याची योजना आखत होती. पंडितांचा मुद्दा हा भाजपच्या निवडणुकीतील फायद्यासाठी खोटा रोष निर्माण करण्याच्या मोहिमेशी सुसंगत होता.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरती चांगला प्रतिसाद मिळत आहे,

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांड आणि निर्गमनावरील चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाचे निर्देशन अभिषेक अग्रवालने केले आहे. सोशल मीडियापासून ते सर्वच प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगत आहे. या चित्रपटाला चाहत्यांकडून बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: "कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय; 'या' दिवशी प्रियकरासोबत गोव्यात बांधणार लग्नगाठ

IFFI 2024: In Conversation मध्ये दिग्गजांची मांदियाळी! रेहमान, मणीरत्नम, रणबीरसोबत खुला संवाद

SCROLL FOR NEXT