Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधींची खासदारकी रद्द ; काळे कपडे परिधान करुन मोदींचा निषेध

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यामुळे देशभरात मोर्चे काढण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi Disqualified as MP: काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना त्यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल मानहानी केल्याबद्दल दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द केली आहे.

यामुळे देशभरात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालुन मोर्च काढले आहेत.

राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या विरोधात महागठबंधनच्या नेत्यांनी बिहारमधील पाटणा येथे काळ्या पट्ट्या बांधून निषेधार्थ मोर्चा काढला आहे.

या व्हिडिओमध्ये सर्व नेत्यांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.

तसेच काँग्रेसचे आमदार आज चेन्नईतील विधानसभेत काळे शर्ट घालून आले. त्यांच्या समर्थनार्थ आमदारांनी फलकही हातात घेतले होते.

संसदेतील सीपीपी कार्यालयात काँग्रेस खासदारांची बैठक बोलावण्यात आली तेव्हा देखील या बैठकीला यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षप्रमुख आणि राज्यसभा एलओपी मल्लिकार्जुन खरगे आणि इतर उपस्थित नेत्यांनी काळे कपडे परिधान केलेले दिसत आहे.

केंद्र सरकार आणि राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यामुळे याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार काळे शर्ट घालून विधानसभेत दाखल झाले. त्यांच्या घोषणाबाजीने आज दुपारी 4 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आले.

दरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा बायो अपडेट केला असून त्यात 'अपात्र लोकसभा सदस्यत्व' असे लिहिले आहे.यामुळे राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT