Exit Poll 2022: उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत झाली होती. उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. तर यावेळी दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत झाल्याने कोण जिंकणार आणि विरोधात बसणार हे पाहायाला लागेल. गेल्या निवडणुकीत भाजपला तेथे यश मिळाले होते. त्यामुळे यावेळी राज्यातील जनतेचा मूड नेमका काय आहे. त्यांच्या अपेक्षांवर भाजप उतरू शकली काय हे एक्झिट पोलच्या निकालावरून कळणार आहे. पण एक्झिट पोलचा निकाल हा अंतिम असू शकत नाही. नक्की काय निकाल येईल? कोणाची सत्ता येईल हे 10 तारखेलाच कळणार आहे. (Congress likely to win 32-38 seats in Uttarakhand)
एक्झिट पोलच्या निकालानुसार भाजपला (BJP) येथे 37 तर काँग्रेसला 31 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाला (AAP) 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) निवडणूकीवेळी भाजपला जास्त मतदान झाले असून काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसचे सरकार (Congress government ) येईल असे पोल वरून दिसत आहे. काँग्रेसला (Congress) 32-38 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 26-32 जागा मिळू शकतात.
दरम्यान, टुडे चाणक्यच्या पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून भाजपला 43 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही भाजपला तगडी टक्कर देताना दिसत आहे. पोलमध्ये काँग्रेसला 24 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यात ३ जागा जाऊ शकतात.
पण एबीपी माझाच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 32 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून भाजपला 26 ते 32 जागा मिळतील असे सांगण्यात येत आहे. तर इतरांना 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास 41 टक्के मतांसह भाजप आघाडीवर असून काँग्रेसला 39% मते मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 11 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.