Priyanka Gandhi  Dainik Gomantak
देश

Priyanka Gandhi: आगामी लोकसभा निवडणूक प्रियांका गांधी लढवणार; 'या' मतदारसंघाची चर्चा

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देखील या मतदारसंघातून मिळवला होता विजय

Akshay Nirmale

Priyanka Gandhi: पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोठी रणनीती आखत आहे. त्या अंतर्गत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांचीही भूमिका महत्वाची राहणार आहे. प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांका गांधी तेलंगणातून निवडणूक लढवू शकतात. काँग्रेस पक्ष याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. प्रियांका गांधी यांना मेडक किंवा महबूबनगर या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.

(Priyanka Gandhi contesting Loksabha Election 2024)

पक्षाने प्रियांका गांधी यांचे नाव निश्चित केले तर त्या तेलंगणातून निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात करतील. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी मेडकची जागा जिंकली आणि त्या सत्तेत परतल्या होत्या. 1980 ची निवडणूक ही इंदिरा गांधींसाठी अत्यंत कठीण निवडणूक होती.

याआधी, आणीबाणीनंतर 1977 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला होता. इंदिराजी स्वतः रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.

सध्याही काँग्रेस कठीण काळातून जात आहे. त्यामुळेच मेडकमधून प्रियांका गांधी यांच्यावर डाव लावला जाऊ शकतो. तेव्हा जनतेने इंदिरा गांधींना ज्या प्रकारे स्वीकारले त्याच पद्धतीने प्रियांका यांना स्वीकारले जाईल, असे काँग्रेसला वाटते.

पक्षाच्या नेत्यांनी प्रियांका गांधी यांच्याशी मेडक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केल्याचेही समजते.

मेडक हा भारत राष्ट्र समितीचा बालेकिल्ला

सध्या मेडक हा मतदारसंघ तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा बालेकिल्ला आहे. बीआरएस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी 2009 मध्ये महबूबनगर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.

यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्यांनी मेडक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्याच वर्षी ते आमदार म्हणूनही निवडून आले आणि त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बीआरएसचे के प्रभाकर रेड्डी यांना पोटनिवडणुकीतही विजय मिळाला.

यासोबतच मेडक हा मतदारसंघ केसीआर यांचे होम ग्राऊंड आहे. 2014 मध्ये, पक्षाने मेडक लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व 7 विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. 2018 मध्ये BRS ने 6 जागा जिंकल्या होत्या. अशा स्थितीत प्रियांका यांना येथून निवडणूक लढणे अडचणीचे ठरू शकते.

तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रियांका तेलंगणातून निवडणुकीची सुरुवात करणार असल्याचे जाहीर झाल्यास त्याचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीचा परिणाम लोकसभेत नक्कीच दिसून येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT