Pawan Khera Dainik Gomantak
देश

Pawan Khera: मोदींच्या वडिलांबाबत टिपण्णी करणाऱ्या काँग्रेस नेते पवन खेरा यांना विमानातून उतरवले...

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

Akshay Nirmale

Pawan Khera: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडिलांबाबत टिपण्णी करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, प्रवक्ता पवन खेरा यांना आज दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. खेरा हे इंडिगो फ्लाइट 6E-204 ने दिल्लीहून रायपूरला जाणार होते.

ते फ्लाईटमध्ये चढले होते. पण त्यांना विमानातून उतरवून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणानंतर काँग्रेस नेत्यांनी विमानतळावरच धरणे आंदोलन सुरू केले.

खेरा हे काँग्रेसच्या छत्तीसगडमधील राष्ट्रीय अधिवेशनाला जात होते. पवन खेरा यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केले होते. याप्रकरणी भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अदानींच्या कथित गैरव्यवहाराबाबत पत्रकार परिषदेत बोलताना पवन खेरा म्हणाले होते की, जर अटलबिहारी वाजपेयी जेपीसी बनवू शकतात, तर नरेंद्र 'गौतम दास' मोदींना काय अडचण आहे? असे विचारून झाल्यावर खेरा यांनी आजूबाजूच्या लोकांना पंतप्रधानांचे मधले नाव मी बरोबर म्हटले आहे का, असा सवाल केला होता.

खेरा यांनी पुन्हा तोच सवाल केला की, 'नरेंद्र गौतम दास मोदींना काय अडचण आहे?' त्यावर काँग्रेस नेत्याने विचारले की, 'हे गौतम दास की दामोदर दास?' त्यावर खेरा म्हणतात की, दामोदरदास असले तरी त्यांची कामे गौतम दास सारखीच आहेत.

दरम्यान, त्यानंतर एका ट्विटमध्ये खेरा यांनी स्पष्ट केले की पंतप्रधानांच्या नावाबाबत मी संभ्रमात होतो.

पवन खेरा यांनी पंतप्रधानांवर केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. पवन खेरा यांच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहे.

दरम्यान, काँग्रेसने या प्रकारावर, ही हुकूमशाही वृत्ती आहे. या हुकूमशहाने अधिवेशनापूर्वी ईडीचे छापे टाकले आणि आता विमानातून उतरवले आहे, अशी टीका केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये उद्यापासून काँग्रेसचे अधिवेशन सुरू होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assam Train Accident: हत्तीच्या कळपाला धडकली राजधानी एक्सप्रेस, आठ हत्तींचा मृत्यू; ट्रेनही रुळावरुन घसरली

Panaji Smart City: पणजी स्मार्ट सिटीचे 92.25% काम पूर्ण; Watch Video

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

SCROLL FOR NEXT