महिला काँग्रेसच्या कार्यवाहक अध्यक्षा नेता डिसूझा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा गुवाहाटीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही झाला आहे.
आता लोकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. याबाबत विरोधकांकडून सातत्याने सरकारला घेरले जात आहे. दरम्यान, काँग्रेस (Congress) नेत्या नेट्टा डिसोझा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यावरून आमने-सामने आल्या. यावेळी डिसोझा केंद्रीय मंत्र्यांना तेलाच्या वाढत्या किमतींबाबत प्रश्न विचारताना दिसल्या. ही संपूर्ण घटना दिल्ली-गुवाहाटी फ्लाइटच्या प्रवासादरम्यान घडली.
त्यानंतर डिसूझा यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला. व्हिडिओमध्ये (Video) सेल फोनवरून संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करताना दिसत आहे. गुवाहाटीला जाताना मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी त्यांना उत्तर दिले. डिसोझा यांनी एलपीजीच्या असह्यपणे वाढणाऱ्या किमतींबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळले आणि लसीकरण आणि मोफत रेशन यावर भाष्य केले. तसेच देशात 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत असल्याचा दावा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.