केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी पंजाबमधील राजकीय उलथापालथीवरून काँग्रेसवर (Punjab Congress) जोरदार निशाणा साधला आहे. काही लोकांच्या वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी काँग्रेस (Congress) राष्ट्रीय सुरक्षेशी (National Security) तडजोड करत असल्याचा हल्ला करत पियुष गोयल यांनी काँग्रेसला लक्ष केले आहे. भाजपसाठी (BJP) राष्ट्रीय सुरक्षा प्रथम येते असे स्पष्ट मत देखील त्यांनी मांडले आहे. (Congress compromises with national security, Piyush Goyal attacks on INC)
यावेळी पियुष गोयल यांनी काँग्रेस नेतृत्व दिवसेंदिवस त्यांच्याच सरकारांना अस्थिर करत असल्याचा देखील आरोप केला आहे . कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांनी 18 सप्टेंबर रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडून ज्या प्रकारचे आरोप करण्यात आले ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत . गोयल म्हणाले की, पंजाबमध्ये काँग्रेस पक्षात काय चालले आहे याबद्दल मी अत्यंत चिंतित आहे कारण आमच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा प्रथम येते.
ते म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केलेली चिंता ही संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब आहे. पंजाबच्या सीमेवरील राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका हा आपल्या सर्वांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. मी एवढेच सांगू शकतो की काही लोकांच्या वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्याच्या पातळीवर गेली आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे.
त्याचबरोबर पंजाब मध्ये चालू असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादाबद्दल विचारल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्ष काय करणार आहे किंवा काय करणार नाही यावर मी भाष्य करू शकत नाही, परंतु आत्तापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा किंवा राष्ट्रीय हिताची चिंता आहे. जी -23 गटाचे नेते वगळता मी अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया ऐकली नाही. काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व राष्ट्राच्या चिंतांपासून पूर्णपणे विभक्त झाले आहे.असे खडतर मत पियुष गोयल यांनी मांडले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.