Temple demolition in Alwar
Temple demolition in Alwar  Dainik Gomantak
देश

'मंदिर वहीं बनाएंगे'; कॉंग्रेस नेते आक्रमक

दैनिक गोमन्तक

राजस्थानमधील अलवर येथील 300 वर्षे जुने मंदिर पाडण्याच्या प्रकरणावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने अलवर जिल्ह्यातील राजगडला भेट दिली. यावेळी काँग्रेस नेत्यांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याच ठिकाणी मंदिर पुन्हा बांधले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते भंवर जितेंद्र सिंह यांनी केली आहे. (Congress aggressive over temple demolition in Rajasthan)

भंवर जितेंद्र सिंह म्हणाले, मला खात्री द्यायची आहे की त्याच ठिकाणी मंदिर बांधले जाईल. तसेच मंदिर पाडण्यास जबाबदार असणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी काँग्रेस नेते घटनास्थळी पोहोचल्यावर लोकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. लोकांनी अशोक गेहलोत आणि भंवर जितेंद्र सिंह यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. राजगडमध्ये जी तीन मंदिरे (Temples) पाडण्यात आली होती ती पुन्हा बांधण्यात येणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.

दुसरीकडे, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ओवेसी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल बोर्डाने हा निर्णय घेतला आणि काँग्रेस सरकारने प्राचीन मंदिर पाडण्याचा निर्णय मान्य केला. याला काँग्रेस आणि भाजप हे दोघेही तितकेच जबाबदार आहेत. त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे.

विरोधी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांचे शिष्टमंडळही अलवर जिल्ह्यातील राजगड येथे पोहोचले. भाजप (BJP) खासदार किरोडीलाल मीणा यांनी ही कारवाई दबावाखाली केलेली असल्याचे म्हटले आहे. अलवर जिल्ह्यातील राजगढमधील 300 वर्षे जुने मंदिर पाडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT