Commercial Cooking gas, LPG Cylinder Price Hike News
Commercial Cooking gas, LPG Cylinder Price Hike News dainik gomantak
देश

LPG Cylinder Price Hike: आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 250 रुपयांची मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला असून या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री लागणार आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 250 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये करण्यात आली आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. याच्याआधीच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली असून दरम्यान कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत कमी होती. मात्र आता कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाणं महाग होऊ शकतं. (Commercial Cooking gas has been increased today by Rs 250 per cylinder)

मराठी परंपरेप्रमाणे नवीन वर्षांच्या आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातीलाच कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्याने एका सिलिंडरसाठी मुंबईत (Mumbai) 1,955 रूपयेमध्ये मिळणऱ्या सिलिंडरसाठी 2,205 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीमध्ये एक सिलिंडर दर हा 2,012 रुपये होता तो आता 2,253 रुपयांवर गेला आहे. तर कोलकातामध्ये दरवाढीनंतर कमर्शिअल गॅस सिलेंडर (Commercial gas cylinder) 2,351वर पोहचला आहे. जो आधी 2,087 रुपये मिळत होता. चेन्नईमध्येही गॅस सिलेंडरची किंमत 2,138 रुपयांवरुन 2,406 रुपयांवर पोहोचली आहे. (LPG Cylinder Price Hike News)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT