Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

मुख्यमंत्री योगी उद्या अयोध्येला जाणार!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1 जून रोजी प्रभू रामाची नगरी असलेल्या अयोध्येत तीन तासांसाठी उपस्थिती लावणार आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) 1 जून रोजी प्रभू रामाची नगरी असलेल्या अयोध्येत तीन तासांसाठी उपस्थिती लावणार आहे. ते एका निर्माणाधीन राम मंदिराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेथे पोहोचणार आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या पायाभरणीसाठी आयोजित समारंभात मुख्यमंत्री पहिल्या कोरीव दगडाचे भूमिपूजन करणार आहेत. (CM Yogi Adityanath to visit Ayodhya tomorrow)

गेल्या आठवड्यात जारी केलेल्या निवेदनात, रामजन्मभूमी ट्रस्ट मंदिर बांधकामाच्या प्रभारींनी सांगितले की, राजस्थानच्या मकराना भागाचा पांढरा संगमरवर गर्भगृहात वापरला जाणार आहे. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पात एकूण 8 ते 9 लाख घनफूट खडक, 6.37 लाख घनफूट ग्रॅनाइट, 4.70 लाख घनफूट गुलाबी खडक आणि 13,300 घनफूट मकराना पांढरा कोरीव संगमरवर यांचा देखील समावेश आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मंदिराचे भूमिपूजन किंवा पायाभरणी समारंभ ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विशेष उपस्थितीत झाले होते, त्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हे मंदिर तयार होण्याची अपेक्षा वर्तवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट 2020 मध्ये मंदिराच्या 'भूमिपूजन' किंवा पायाभरणी समारंभाला उपस्थित राहिले होते, त्यानंतर बांधकामाला सुरूवात करण्यात आली. 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी मंदिर तयार होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

काशी विश्वनाथ मंदिराशेजारील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) आणि कृष्णजन्मभूमीच्या शेजारी असलेल्या मथुरा शाही ईदगाहच्या वादावर न्यायालयीन खटल्याची सुनावणी सुरू असताना या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा पार पडणार आहे. ज्ञानवापीशी संबंधित प्रकरणामध्ये, मशिदीच्या आतील व्हिडिओग्राफीच्या न्यायालयाच्या आदेशाने विशेषत: सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT