CM Hemant Soren ANI
देश

CM Hemant Soren Disqualification: झारखंड CM हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यपालांना पत्र पाठवले आहे.

दैनिक गोमन्तक

CM Hemant Soren Disqualification: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यपालांना पत्र पाठवले आहे. सोरेन यांच्या नावाने खाण घेण्याच्या प्रकरणी आयोगाने ही शिफारस केली आहे. राज्यपाल रमेश बैस आज दुपारी दिल्लीहून निघतील आणि दुपारी 2 वाजता रांचीला पोहोचतील. सुमारे तीन वाजेपर्यंत ते राजपत्रात प्रसिद्ध होईल.

सीएम सोरेन यांच्यावर काय आरोप आहेत

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये दावा केला होता की सोरेन यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि स्वतःच्या नावाने खाण केली आहे. या प्रकरणात हितसंबंधांचा संघर्ष आणि भ्रष्टाचाराचा समावेश आहे. लोकप्रतिनिधीने कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने मे महिन्यात सोरेन यांना नोटीस पाठवून खाण लीजबाबत त्यांचे स्पष्टिकरण मागितले होते.

आता झारखंडमध्ये काय होणार

झारखंडमध्ये सरकार चालवत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानेही आता हेमंत सोरेन यांच्या पर्यायाची चर्चा केली आहे. सीएमपद सोरेन कुटुंबाकडेच राहणार असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी भाजपने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की हेमंत पर्याय म्हणून पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव पुढे करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: किंग कोहलीची बॅट 'फायर' मोडवर...! विराटच्या निशाण्यावर मोठा ऐतिहासिक रेकॉर्ड; सलग तिसरे वनडे शतक ठोकण्याची सुवर्णसंधी

Partgali Banyan Tree: 1000 वर्षे जुना, तळपण नदीच्या उजव्या काठावरती वसलेला, पर्तगाळी येथील 'पवित्र वटवृक्ष'

Serendipity Art Festival: क्ले‌ प्ले, मोटाऊन मॅडनेस, रिफ्लेट! 'सेरेंडिपीटी'त अनुभवा जादुई सादरीकरणे

Abhang Repost: ‘चल ग सखे... पंढरीला'! म्‍हापशात ‘अभंग रिपोस्‍ट’चा जल्लोष; भक्तिरसात न्हाले शहर

World Soil Day: चिंताजनक! 2045 पर्यंत पृथ्वीवर 40% कमी अन्न तयार होण्याची शक्यता; गोव्यासमोरही मोठी समस्या..

SCROLL FOR NEXT