Madhya Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: वाघिणीचे नखं आणि दात कापले, काळ्या जादूने 'पत्नीला वश' करण्याचा प्रयत्न, मध्य प्रदेशातील धक्कादायक प्रकार

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात घडलेल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडले. 26 एप्रिल रोजी जंगलातील बफर झोनमध्ये एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली होती.

Manish Jadhav

मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात घडलेल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडले. 26 एप्रिल रोजी जंगलातील बफर झोनमध्ये एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली होती. फॉरेन्सिक तपासात या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असला तरी पाच संशयितांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनी कबूल केले की, ते त्यांच्या पत्नीला वश करण्यासाठी जादूटोणा करण्याचा प्रयत्न करत होते.

टाईम्स ऑफ इंडिया (टीओआय) च्या वृत्तानुसार, राज कुमार आणि झाम सिंग यांनी सांगितले की ते एका स्थानिक जादूगाराच्या सल्ल्यानुसार काम करत होते. त्याने असा दावा केला होता की, वाघाच्या पंजात गूढ शक्ती असते, ज्यामुळे वैवाहिक संबंधांत पत्नीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळते. वाघाच्या पंजाचा विशिष्ट विधी केल्यास पत्नीला वशमध्ये ठेवण्यास मदत होते.

स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष तपास पथकाने संशयितांचा शोध घेतला. वाघिणीचे नखे, तीन दात आणि कातडीचे तुकडे अनेक ठिकाणांहून जप्त केले. संशयितांना सुरुवातीला बफर झोनमध्ये शिकार करताना वाघिणीचा मृतदेह सापडला. मात्र जवळच दुसरा वाघ असल्याने ते भीतीने तिथून निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी वाघीणीचे क्रूरपणे शरीर कापले.

दरम्यान, जादूटोणा करणाऱ्याने जेव्हा जादूसाठी प्राण्याची कातडी आवश्यक असल्याचा आग्रह धरला तेव्हा संशियत पुन्हा एकदा जंगलात गेले आणि विधीसाठी वाघिणीच्या कातडीचा ​​एक भाग कापून घेऊन आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, या भागात अजूनही काळी जादू आणि अंधश्रद्धांवर लोकांचा प्रगाढ विश्वास आहे. गूढ विधींसाठी वाघ आणि बिबट्यांची शिकार करण्याची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. दरम्यान, आरोपींना 3 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने वन विभागाच्या कोठडीत पाठवले. या धक्कादायक प्रकरणात आणखी किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास सध्या केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT